शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

विद्यार्थिनीला 'ब्लॅकमेल' करणारा प्राध्यापक अटकेत

By admin | Published: September 09, 2015 12:08 AM

विनयभंग करून 'ब्लॅकमेल' करणाऱ्या प्राध्यापकाच्या अत्याचाराला कंटाळून विद्यार्थिनीने औषधीच्या भरमसाठ गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

अमरावती : विनयभंग करून 'ब्लॅकमेल' करणाऱ्या प्राध्यापकाच्या अत्याचाराला कंटाळून विद्यार्थिनीने औषधीच्या भरमसाठ गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी विनयभंग व खंडणीचा गुन्हा दाखल करून विदर्भ महाविद्यालयातील कंत्राटी प्राध्यापक प्रवीण उगले (२६, रा. बोर्डी, अकोट) याला गाडगेनगर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. परजिल्ह्यातील रहिवासी असलेली एक १८ वर्षीय मुलगी २०१३ मध्ये अमरावतीत शिक्षणासाठी आली. ती शहरातील एका नामांकित महाविद्यालयात मराठी वाङ्मयाचे शिक्षण घेत आहे. मात्र, तेथेच तिच्या ओळखीतील कंत्राटी प्राध्यापक आरोपी प्रवीण उगले भेटला. प्रवीणने डाव साधून तिचा विनयभंग केला आणि तिचे अश्लील छायाचित्र काढून 'ब्लॅकमेल' करणे सुरु केले. याबाबत पीडित विद्यार्थिनीने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या हेल्पलाईनकडेसुध्दा धाव घेतली. मात्र, त्यानंतरही तिला त्रास देऊन प्रवीण पैशांची मागणी करू लागला. प्रवीणने अनेकदा पीडित विद्यार्थिनीचे एटीएम कार्ड हिसकून तिच्या खात्यातील पैसे काढून घेतले. हा अत्याचार वाढत असल्यामुळे पीडिताने सोमवारी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून प्रवीण उगलेविरूध्द तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या २९४, २५४, ३८४ अन्वये गुन्हा नोंदविला. यासंबंधाने विदर्भ महाविद्यालयाच्या संचालकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. सदर तक्रार आमच्याकडे आली होती. प्राध्यापकाला बोलवून आम्ही समज दिली होती. चूक झाल्याचे त्याने लिहून दिले. तथापि, मुलीचे समाधान झाले नाही. पोलीस तक्रार करण्याचा सल्ला आम्ही दिला. - संजय तिरथकर,हेल्पलाईन.पीडित मुलीला उपचाराकरिता नागपूरला हलविलेप्रवीण हा महाविद्यालयातील अन्य मुलींना लग्नाचे आमिष देऊन फसवणूक करीत असल्याची माहिती पीडित विद्यार्थिनीने दिलीे. अब्रूच्या भीतीपोटी पीडिता आतापर्यंत प्रवीणविरुद्ध खुलून संघर्ष करीत नव्हती. तथापि, अत्याचार वाढतच गेल्याने अखेर तिने सोमवारी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. अत्याचाराच्या असह््य विचारांमुळे मानसिक तणावात असल्याची आणि औषधीचा अतिरिक्त डोज घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पीडिताने पोलिसांना दिली. कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिला पुढील उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले.