लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील वडगावनजिक गावठी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काळवीटाची शेतकऱ्यांनी सूटका केली. ही घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून काळविटावर उपचार केल्यानंतर त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.तालुक्यातील सावळी येथील विशाल गावंडे यांना वडगाव रस्त्याच्या कडेला काही गावठी कुत्री काळविटाचे लचके तोडत असताना दिसले. त्यांनी कुत्र्यांना हाकलून लावले व बाजूच्या शेतातील श्रीकृष्ण पोटे, देवेश राणे, विशाल खोडके, तेजस शेंडे यांना मदतीसाठी बोलाविले. जखमी काळविटाला पाणी पाजले. पशुवैद्यकीय अधिकारी जाम्बू यांना घटनास्थळी बोलावून जखमी काळविटावर उपचार करण्यात आले व काळविटाला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
कुत्र्यांच्या तावडीतून वाचविला काळविटचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 10:28 PM
अचलपूर तालुक्यातील वडगावनजिक गावठी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काळवीटाची शेतकऱ्यांनी सूटका केली. ही घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून काळविटावर उपचार केल्यानंतर त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
ठळक मुद्देसावळी शिवारातील घटना : वनविभागाने घेतले ताब्यात