शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

विधिमंडळात भय्यासाहेबांच्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:18 PM

माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भैयासाहेब उपाख्य चंद्रकांत रामचंद्र ठाकूर यांच्या निधनानंतर विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी शोकप्रस्ताव सादर केला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी भय्यासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

ठळक मुद्देआ. यशोमतींचेही सांत्वन : मुख्यमंत्र्यांनी मांडला शोकप्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भैयासाहेब उपाख्य चंद्रकांत रामचंद्र ठाकूर यांच्या निधनानंतर विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी शोकप्रस्ताव सादर केला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी भय्यासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.विधानसभा सभागृहात भय्यासाहेबांना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार, सभागृहातील शेकापचे ज्येष्ठ आ. गणपतराव देशमुख, शिवसेना नेते व सा. बां. मंत्री एकनाथ शिंदे, आ. वीरेंद्र जगताप या नेत्यांनी भय्यासाहेबांप्रती भावना सभागृहात मांडल्या.यामध्ये भय्यासाहेबांचा राजकीय जीवनाची सुरूवात, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान, राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर घडलेले त्यांचे कार्यकर्तृत्व, रामचंद्र युवक कल्याण संस्थाच्या माध्यमातून कबड्डी व क्रिकेट खेळाला प्राधान्य, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांची संघटन बांधणी, स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे विश्वासू, पक्षनिष्ठ, विकासाची दूरदृष्टी व मतदारसंघात त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क, साधी राहणी, स्व. राज्यपाल प्रभाताई राव यांच्या काळातील पक्ष बांधणी, तिवसा मतदारसंघातील रस्त्याचे जाळे, विकास आदीबाबत त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यात आला. काँग्रेस पक्ष, युवक काँग्रेस व तिवसा मतदारसंघात विकास कामे याबाबत त्यांनी दिलेले योगदान हे अमूल्य असल्याचे मान्यवर मंडळींनी सभागृहात आपल्या शोक प्रस्तावात म्हटले. यावेळी ठाकूर कुटूंब, आ. यशोमती ठाकूर यांचे सांत्वन सुद्धा करण्यात आले.