ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघाने सुरू केलेल्या रक्तदान चळवळीला तालुक्यातून अनेक सेवाभावी संस्था, संघटनांनी हातभार लावल्याने हजारो गोरगरीब, गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यात मदत झाली. हीच संकल्पना लक्षात घेऊन सभापती विक्रम ठाकरे यांच्या संकल्पनेतून ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त पंचायत समितीच्यावतीने दरवर्षी रक्तदान शिबिर घेण्यात येते. यावर्षीसुद्धा रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान चळवळीस साथ देत पंचायत समिती पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच पंचायत समिती अंतर्गत शिक्षक , ग्रामसेवक, रोजगारसेवक यांनी रक्तदान केले. रक्त संकलनाकरिता नागपूरच्या हेडगेवार रक्तपेढीने सहकार्य केले, तर रक्तदाता संघ आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदारसह सर्व अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. सभापती विक्रम ठाकरे यांनी रक्तदात्यांना वृक्ष भेट दिले. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पंचायत समिती उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे, सदस्या सिंधू करणाके, गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र साबळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी राजू पाटील आदी उपस्थित होते.
क्रांती दिनानिमित्त पंचायत समितीत ८२ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:16 AM