फोटो पी १९ धामणगाव रक्तदान
धामणगाव रेल्वे : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व जाणवणारी रक्ताची टंचाई पाहता, शहर काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ९५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
स्थानिक गिरधारीलाल द्वारकादास पसारी धर्मशाळेत आयोजित या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले. रक्तसंकलन अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल महाविद्यालयाच्या वैद्यकीय चमूने केले. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन दगडकर यांनी रक्तदान करून शिबिराला सुरुवात केली. तालुक्यातील व शहरातील तब्बल ९५ युवक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. पंचायत समिती सभापती महादेव समोसे, उपसभापती माधुरी दुधे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन कनोजिया, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन सिंघवी, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष परीक्षित जगताप, युवक काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष आशिष शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती पंकज वानखडे, श्रीकांत गावंडे, यशवंत बोरकर, शुभम भोंगे, सुधीर शेळके, नंदकुमार मानकर, अविनाश शेळके, शुभम चौबे, प्रदीप मुंदडा, सुनील भोगे, वैभव पावडे, नितीन देशमुख, संतोष पळसापुरे उपस्थित होते.