धामणगाव : रेल्वे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने उद्या शनिवारी सकाळी ९ वाजता रक्तदान व विविध तपासण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
धामणगावात दरवर्षी वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील विमल प्लाझा परिसरात मंडळाच्या वतीने रक्तदान, नेत्रदान नेत्र तपासणी व मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे. या शिबिरात हरिना नेत्रदान समितीचा सहभाग राहणार आहे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. स्वप्निल बोरगे, पवन भगत यांच्याद्वारे तपासणी करण्यात येणार आहे या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन सुधीर भुतडा, निखिल बुधलानी, आकाश बुटले, हर्षल सूर्यवंशी नेत्रदान समितीचे अशोक मुधडा यांनी केले आहे.