रक्तदाता संघ : समाजप्रबोधन मंच, जामा मशिद ट्रस्टचा उपक्रम वरूड : ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघाने दीड वर्षांपासून रक्तदान चळवळ सुरू करून हजारो रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला. संघाचे कार्यर् पाहता अनेक सेवाभावी संस्थांनी सहकार्य केले. रक्तदान शिबिराचे आयोजन सुरू केले. १ मे रोजी शहरातील जामा मशीद फंक्शनल हॉल ट्रस्ट, समाजप्रबोधन मंच आणि रक्तदातासंघाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेतले. यामध्ये १५८ मुस्लीम स्त्री पुरुषांंनी रक्तदान केले. वरुडमध्ये १ जानेवारी २०१५ मध्ये उदयास ग्रामीण रुग्णालय संलग्नीत रक्तदाता संघ स्थापन झाला. १६ महिण्यात पाच हजारापेक्षा अधिक रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला. यामुळे तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. रक्तदानासाठी होणारा हजारो रुपयांचा खर्च टाळणे शक्य झाले. दर महिन्याला रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तसाठवण केली जाते. यातून गरजूंना रक्त दिले जात आहे. या चळवळीची सर्व धर्मातील लोकांनी तसेच विविध पक्ष, संस्था, संघटनांनी दखल घेऊन रक्तदान शिबिरे घेण्यास सहकार्य करीत असते. गत वर्षीपासून संघटनासुध्दा रक्तदान शिबिर घेत आहे. जामा मशीद फक्शनल हॉल ट्रस्ट आणि समाजप्रबोधन मंचच्यावतीने १ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करून १५८ स्त्री पुरुष मुस्लिम रक्तदात्यांनी रक्तदान करून महाराष्ट्र दिन साजरा केला. उपविभागीय अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे पथक तसेच रक्तदाता संघाचे ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक प्रमोद पोतदार, रक्तदाता संघाचे अध्यक्ष जितेंद्र शेटीये, उपाध्यक्ष प्रविण चौधरी, दिलीप भोंडे, सचिव चरण सोनारे, शैलेश धोटे, संजय खासबागे, उपाध्यक्ष योगेश ठाकरे, डॉ.पंंकज केचे, सुधाकर राऊत, प्रवीण खासबागे, सचिन परिहार, अतुल काळे, यशपाल जैन, आशिष वानखडे, मनोहर थेटे, मुकीन भाई, रफिकभाई, अश्पाक भाईसह त्यांच्या सहकार्यांनी रक्त संकलित करण्याकरिता मदत केली. (तालुका प्रतिनिधी)
वरुडात महाराष्ट्र दिनी मुस्लीम समाजाचे रक्तदान
By admin | Published: May 03, 2016 12:29 AM