शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; शिवसेना नेत्यांचा आग्रह मान्य?
2
Devendra Fadnavis Exclusive: "‘बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण करणार’; पाच वर्षे राज्याला गतिमान बनविणार!"
3
राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२४: 'या' लोकांना आर्थिक लाभ संभवतात, नशिबाची साथ लाभेल
4
त्याग करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन कुणासाठी? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मुख्यमंत्री फडणवीसच, आज मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा
6
खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे : एकनाथ शिंदे
7
भूकंप तेलंगणात, हादरा विदर्भात! भूकंपाची तीव्रता ही ५.३ रिश्टर स्केल
8
शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी नौदल अधिकाऱ्यांची नावे द्या; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
9
मेडिकल परीक्षेलाही पेपरफुटीची बाधा, खबरदारी म्हणून ऐन वेळी बदलला फार्माकॉलॉजी-२ चा पेपर
10
निकृष्ट दर्जाचे फूड आढळल्यास शिक्षणाधिकारी जबाबदार ; पालघरच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा लेखी फतवा
11
वह समंदर है, लौटकर आया है... आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...
12
राज्यात पुन्हा देवेंद्र... बूथप्रमुख’ ते ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ आणि आता ‘पुन्हा मुख्यमंत्री’ असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला
13
लाडक्या बहिणीला मदत मिळाली, आता हवे ‘सक्षमीकरण’
14
प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी?
15
हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा
16
BRI Project : चीनसोबत करार करून खूश झालेल्या ओलींना दिसेना धोका, भारताचंही टेन्शन वाढवलं!
17
IND vs AUS: रोहित शर्माने दुसऱ्या टेस्टमध्ये किती नंबरला बॅटिंग करावी? रवी शास्त्रींनी दिला विशेष सल्ला, म्हणाले...
18
Video: पुलवामात दहशतवादी हल्ला; सुट्टीवर घरी आलेल्या जवानावर झाडल्या गोळ्या
19
तिसरं महायुद्ध होऊनच राहणार...? बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाणीत विनाशाचा संदेश; सांगितलं, केव्हा होणार महायुद्ध?
20
“मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे

जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा; अमरावतीकरांना रक्तदानाचे आवाहन

By उज्वल भालेकर | Published: December 04, 2024 11:36 AM

Amravati : रक्तासाठी नातेवाइकांची धावपळ ; दिवाळी, निवडणुकींचा परिणाम

उज्ज्वल भालेकर लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यातील रुग्णसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील खासगी रक्तपेढीमध्येही सारखीच परिस्थिती असल्याने अनेक गरजू रुग्णांना वेळेत रक्तपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. रक्ताअभावी अनेक शस्त्रक्रियाही पुढे ढकलल्या जात असल्याची माहिती आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या धामधुळीत, तसेच दिवाळीच्या उत्सवामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन मंदावल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णांसाठी आवश्यक रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदान करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून होत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. येथे असलेली रक्तपेढीतून इतरही शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालय, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, तसेच जिल्ह्यातील इतरही खासगी रुग्णालयांत रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना देखील या रक्तपेढीमधूनच रक्त पुरवठा केला जातो. तसेच, एक महिन्यापूर्वीच धारणी उपजिल्हा रुग्णालयातही रक्तपेढी कार्यान्वित झाली आहे. या रक्तपेढी व्यतिरिक्त जिल्ह्यात सहा खासगी रक्तपेढी देखील आहेत, परंतु नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक काळात सर्वच राजकीय व सामाजिक संघटना या व्यस्त असल्याने त्याचा परिणाम हा नियमित होणाऱ्या रक्तदान शिबिरावर पडला जिल्ह्यात जवळपास २४ शासकीय, तर १५० च्या जवळपास खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे येथे भरती हजारो रुग्ण भरती असून, बहुतांश रुग्णांना रक्ताची गरज असते.

मंगळवारी असा होता उपलब्ध रक्तसाठा राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या निर्देशांनुसार शासकीय, तसेच खासगी रक्तपेढींना उपलब्ध रक्त संकलनाची माहिती ही ऑनलाइन रक्तकोषवर दररोज उपलब्ध बंधनकारक आहे. त्यामुळे ई- मंगळवारी ई-रक्तकोषवर जिल्ह्यातील रक्तपेढीतील उपलब्ध माहितीनुसार इर्विन रक्तपेढीत १३ बॅग, डॉ. सदानंदजी बुर्मा ट्रस्ट रक्तपेढी परतवाडा येथे ० बॅग, संत गाडगेबाबा रक्तपेढी ६ बॅग, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी २ बॅग, श्री बालाजी रक्तपेढीत ० बॅग, राजेंद्र गोडे रक्तपेढी ०, धारणी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी येथे ८ बॅग, तर जय माता दी मेळघाट रक्तपेढी येथे ६ बॅग रक्तसाठा हा दुपारी एक वाजेपर्यंत उपलब्ध होता.

इर्विनमध्ये एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये झालेले रक्तदानमहिना                                 झालेले रक्तदान एप्रिल                                        ९३१मे                                              ६५९जून                                            ७७५जुलै                                           ६३६ऑगस्ट                                       ८४५सप्टेंबर                                        ५३९ऑक्टोबर                                    ७२०नोव्हेंबर                                      ७११

"रक्ताची होणारी मागणी आणि उपलब्ध रक्तसाठा यामध्ये तफावत आहे. रक्ताची गरज लक्षात घेता नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याची तसेच रक्तदान शिबिरे आयोजित करावे. जेणेकरून गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करता येईल."- डॉ. आशिष वाघमारे, रक्तपेढी प्रमुख.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीAmravatiअमरावती