संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील सांस्कृतिक भवनानजीकच्या महापालिकेचे व्यापारी संकुलास मद्यशौकिनांनी दारूचा अड्डा बनविला आहे. रोज रात्री संकुलातील दुकाने बंद झाल्यानंतर यथेच्छ दारू ढोसली जात असल्याचे वास्तव आहे. या ठिकाणी पडलेल्या रिकाम्या दारूच्या बॉटल्स, डिस्पोजेबल ग्लास याची साक्ष देतात. मात्र, अनेक महिन्यांपासून सुरू असललेल्या या प्रकाराकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे.संत गाडगेबाबांच्या नावाने उभारण्यात आलेल्या या व्यापारी संकुलाबाहेरही अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्याचा खच या ठिकाणी निदर्शनास आला. हा प्रकार सुरू असताना, गाडगेनगर पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु, रात्र झाली की, तरुणांच्या जत्थे येथे बसतात. मोबाइलवरील गेम खेळण्याच्या बहाण्याने तासन्तास घालविले जातात. यादरम्यान वाइन व बीअर शॉपीमधून विकत आणलेली दारू या ठिकाणी डिस्पोजेबल ग्लासमध्ये टाकून प्यायली जाते. व्यापारी संकुलातील दुकाने रात्री ९ ते १० वाजता बंद होतात. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत तरुणांच्या दारूच्या पार्ट्या चालत असल्याची माहिती आहे. या संकुलामागे उच्चविभूषित नागरिकांची वसाहत आहे. त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे दोन ते तीन चहा कँटीनसुद्धा आहेत. येथे तरुणांनी स्मोकिंग झोनच बनविला आहे. सर्रास धूम्रपान केले जात असल्याने याचा परिणाम विद्यार्थी व तरुणांच्या आरोग्यावर होत असल्याचे मत एका तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. संत ज्ञानेश्वर संकुलाच्या बाहेरील गेटनजीक नालीत व आसपास दारूच्या बॉटलांचा खच आढळतो. या ठिकाणी दारूच्या रित्या बॉटल, ग्लास, सिगारेटचे व खाद्यपदार्थाचे रिकामी पाकीट अस्ताव्यस्त असतात. हा प्रकार नित्याचाच झाला असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी व कारवार्इंचा बडगा उगारावा अशी मागणी करण्यात येत आहे.संकुलातील खोलवट भाग फायद्याचासंत गाडगेबाबा महापालिका व्यापारी संकुल असे या संकुुलाचे नाव आहे. पहिल्या माळ्याची दुकाने रस्त्याच्या खाली येतात. त्यामुळे या दुकानांपुढे नेमके काय सुरू आहे, याची शहानिशा रस्त्यावरून होत नाही. त्याचा फायदा आंबटशौकिनांनी घेतला असून, दुकाने बंद झाल्यानंतर मद्यासह अनेक शौक येथे पुरे केले जातात.परिसरात रात्रकालीन गस्त घालण्यात येणार आहे. या ठिकाणी उघड्यावर दारू पिताना कुणी आढळल्यास पोलिसांकडून नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.- दत्ता देसाईसहायक पोलीस निरीक्षक गाडगेनगर ठाणे
महापालिकेचे व्यापारी संकुल बनले दारूचा अड्डा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 10:23 PM
येथील सांस्कृतिक भवनानजीकच्या महापालिकेचे व्यापारी संकुलास मद्यशौकिनांनी दारूचा अड्डा बनविला आहे. रोज रात्री संकुलातील दुकाने बंद झाल्यानंतर यथेच्छ दारू ढोसली जात असल्याचे वास्तव आहे. या ठिकाणी पडलेल्या रिकाम्या दारूच्या बॉटल्स, डिस्पोजेबल ग्लास याची साक्ष देतात. मात्र, अनेक महिन्यांपासून सुरू असललेल्या या प्रकाराकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे.
ठळक मुद्देमद्यपी सुसाट : दुकाने बंद झाल्यानंतर मद्यप्राशनासाठी ठिय्या