शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

अचलपूर बाजार समितीचे संचालक मंडळ फुर्रर्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:13 AM

फोटो पी ०१ अचलपूर परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीत झालेल्या नोकरभरती प्रकरणात संचालक मंडळावरसुद्धा अटकेची कारवाई होण्याच्या भीतीने ...

फोटो पी ०१ अचलपूर

परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीत झालेल्या नोकरभरती प्रकरणात संचालक मंडळावरसुद्धा अटकेची कारवाई होण्याच्या भीतीने संबंधितांची पाचावर धारण बसली. गुरुवारी परिसरातीलच गजानन महाराज मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर नतमस्तक होत एक वगळता सर्व संचालक मंडळ गावातून बेपत्ता झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सहकारक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कुणाकडून अटकेची ‘पुडी’ सोडून ‘एप्रिल फुल’ करण्याचा प्रयत्न झाल्याचीही खमंग चर्चा आहे.

अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीमधील सरळसेवा नोकरभरती प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामध्ये सहायक सचिव मंगेश भेटाळू, शिपाई शैलेश शुक्ला व लता वाजपेयी यांच्याविरुद्ध अचलपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. यादरम्यान नोकरभरती करणाऱ्या कंपनीच्या संचालकांना अटक करण्यात आली होती, तर मंगेश, शैलेश व लता यांनी नागपूर न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी अटकेतील सर्व आरोपींचे बयाण नोंदविले. तपासात अनेक गंभीर बाबी पुढे आल्याची कुणकुण संचालक मंडळाला लागली. त्यामुळे मागील चार दिवसांपासून बाजार समितीच्या संचालक मंडळांत अस्वस्थता पसरली होती.

बॉक्स

जय गजानन... अन रफुचक्कर !

गुरुवारी बाजार समितीच्या आवारातील गजानन महाराजांच्या मंदिरात अनेकांनी नतमस्तक होत दर्शन घेतले. ‘आलेले संकट गजानना दूर कर’ असे म्हणत मिळेल त्या दिशेने तीन ते चार जणांच्या टोळक्यात संचालक मंडळ वेगवेगळ्या वाहनाने रफुचक्कर झाल्याची चर्चा आहे. यातील काही संचालकांना गुरुवारी दुपारी १२ नंतर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे माहिती मिळू शकली नाही.

बॉक्स (उडवू नये)

भादंवि १२० ब आणि ३४ ची दहशत

संपूर्ण जिल्ह्यात सहकार क्षेत्रात खळबळ माजवून देणारा अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समिती या सरळ सेवा भरती प्रकरणात सहायक सचिव मंगेश भेटाळू, शिपाई शैलेश शुक्ला, लता वाजपेयी, केएनके कंपनीचे संचालक यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ४६५, ४७१, ४६८, ३४, १२० बी अन्वये २१ डिसेंबर २०२० रोजी गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे १२० बी (अवैज्ञानिक कट-कारस्थान करणे ) ३४ ( सामूहिक जबाबदारी) या कलमानुसार कोणत्या संचालकांचा किती सहभाग आहे, यावरूनच ही कारवाई होणार असून, संचालक मंडळाला केव्हाही अटक होण्याची भीती पाहता, त्यांनी पळ काढल्याची माहिती पुढे आली आहे.

कोट

सदर प्रकरणात पूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वेगळे गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सदर प्रकरणाचा कुणाचा किती सहभाग आहे, हे पाहण्यात येईल व तपास सुरू आहे.

- सेवानंद वानखडे, ठाणेदार, अचलपूर