पोलीस मृतदेहाची ओळख पटविण्याकरिता नातेवाईकांचा शोध घेत आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.
----------------------------------------------------------
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
अमरावती : खोलापुरीगेट ठाण्यांतर्गत कांडलकर प्लॉट येथे एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. अरुण रमेशराव राऊत (२३, रा. कांडलकर प्लॉट) असे मृताचे नाव आहे. गळ्याच्या आजाराचा त्रास वाढल्याने कंटाळून त्याने गळफास घेतला असावा, अशी माहिती मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
------------------------------------------
उपचार दरम्यान वृद्धाचा मृत्यू
अमरावती : एका ६० वर्षीय वृद्धाला ४ एप्रिल रोजी उपचारार्थ इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास सदर वृद्धाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची घटना इर्विन रुग्णालयात घडली. दिगांबर महादेवराव मोहोड (६०, रा. अंबागेट अमरावती) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.