जीम खरेदीचा वाद : असोरिया पेट्रोल पंपासमोरील घटनालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर नावेद इकबाल ऊर्फ पप्पू अब्दुल खलील (२७,रा. छायानगर) याची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. मंगळवारी दुपारी ११.४५च्या सुमारास वलगावमार्गावरील असोरिया पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. या हत्याकांडामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जीम खरेदीच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. पोलीससूत्रानुसार, पप्पू बिल्डर नावाने परिचित नवेद इकबालने ्अनेक शरीर सौष्ठव स्पर्धा गाजविल्या. त्याने ‘नॅशनल बॉडी बिल्डिंग’ स्पर्धेत सुवर्ण पटकाविले असून सध्या तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीत होता. असेरिया पेट्रोल पंपासमोरील राराणी मेडिकलमध्ये नोकरी करून तो सायंकाळी नमक कारखान्याजवळील रहीम पठाण यांच्या जीममध्ये जात होता. हा जीम रहीमचा मोठा भाऊ अयुब पठाणचा आहे. मात्र, हा जीम अयुबने नवेदला तीन दिवसांपूर्वी चालवायला दिला होता. त्यामुळे रहीम नाराज झाला होता. यावरून रहीम व नावेदमध्ये रविवारी शाब्दिक वाददेखील झाला होता. मंगळवारी दुपारी नवेद हा राराणी मेडिकलजवळील सिंडिकेट बँकेच्या एटीएममध्ये गेला असता त्याला रहीम पठाणसह जिशान, अलिशान व दोन साथीदारांनी घेराव घातला. त्याला बँकेच्या आवारात नेऊन चर्चा केली आणि त्यानंतर रहीम व नवेदमध्ये हाणामारी सुरू झाली. नवेद भारी पडत असल्याचे पाहून आरोपींनी त्याच्यावर चायना चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या केली. रक्तबंबाळ अवस्थेत नवेदला सोडून आरोपींनी पलायन केल्यानंतर काही नागरिकांनी त्याला आॅटारिक्षात टाकून इर्विन रूग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भरदिवसा घडलेल्या या थरारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागपुुरी गेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे वलगावमार्गावर हजारोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी उसळली होती. पोलिसांनी पंचनामा करून आरोपींचे शोधकार्य सुरू केले आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनीही तत्काळ सूत्र हलविले. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनीही घटनास्थळाला भेट देऊन चौकशी सुरू केली होती. हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैदसिडिकेंट बँकेच्या आवारात झालेल्या या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. नावेदसोबत चर्चा करीत असताना अचानक चाकूने हल्ला केल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. हत्याकांडादरम्यान घटनास्थळावर पाच जण सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. आरोपींची शोधमोहीमरहीम पठाण, जिशान, अलिशान व अन्य दोघे हत्येच्यावेळी घटनास्थळावर होते. रहीम पठाण नावेदशी बोलत असताना व जिशान व त्याचे तीन साथीदार नावेदवर चाकूने हल्ला चढविताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या फुटेजवरून पोलिसांनी आरोपींच्या घराची झडती घेऊन त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना चौकशीकरिता ताब्यात घेतले होते. मात्र, आरोपी पसार झाले आहेत. पोलीस सूत्रानुसार जिशान व अलिशान हे पोलीस रेकॉर्डवरील आरोपी आहेत. त्यांच्याविरूद्ध नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.नावेदने गाजविल्या अनेक शरीर सौष्ठव स्पर्धानावेद इकबाल तरुणांनो हेल्थ सेंटरमध्ये मार्गदर्शन करीत होता. त्याने जिल्हा स्तरावर आयोजित अनेक शरीर सौष्ठव स्पर्धा गाजविल्या होत्या. आपल्या या पिळदार शरीरयष्टीचा आधार घेऊन त्याला पोलीस विभागात भरती व्हायचे होते. पोलीस उपनिरीक्षक होण्याचे त्याचे स्वप्न होते. याच अनुषंगाने आठवडाभरापूर्वी नागपुरी गेटचे ठाणेदार चव्हाण यांच्या भेटीला तो गेला होता. आझाद श्री, कामगार श्रीचा खिताब त्याने पटकावला होता. तो अमरावती विद्यापीठाचा कलर कोट होल्डर होता. एका होतकरू बॉडी बिल्डरच्या हत्येने जिल्हा हादरला आहे.
बॉडी बिल्डर पप्पूची भरदिवसा निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:06 AM