लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील शरीरसौष्ठवपटू विजय भोयर याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने टायगर अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. तो वाघांचे संगोपन, संरक्षणासाठी प्रचार व प्रसार करणार असून, लवकरच तसा करार होणार आहे.वाघांचे संंगोपन आणि संरक्षणासाठी प्रचार व प्रसार जोरकसपणे करता यावा, याकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांनी स्थानिक शरीरसौष्ठवपटू विजय भोयर यांची टायगर अॅम्बेसेडर म्हणून नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. विजय भोयर याने बँकाँक येथे नुकतेच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताला सिल्व्हर पदक मिळवून दिले आहे. तो स्पर्धेत दुसºया क्रमांकावर होता. भोयर हा अतिशय सामान्य कुटुंबातील आहे. त्याने मिळविलेल्या सिल्व्हर पदकपदकाने अमरावतीचे नाव देशपातळीवर मानाने घेतले जात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ‘टायगर टेक’ प्रमोशनसाठी भोयर याची निवड केल्यामुळे स्थानिक क्रीडापटुला नवी संधी मिळाली आहे. वाघांचे संरक्षण, संगोपनासह मानवी साखळीत वाघ का आवश्यक असल्याचा प्रसार, प्रचार करताना तो कर्मचाºयांना शरीरयष्टी सुखरूप ठेवण्याचे टीप्स देणार आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवानांना व्याघ्र सीमेवर वाघांची तस्करी, शिकार रोखण्यासाठी भोयर मार्गदर्शन करणार आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाघ, जंगलाप्रती प्रेम,आस्था निर्माण करण्यासाठी कार्यशाळा, चर्चांमध्ये तो आवर्जून सहभागी राहणार आहे. मानधनावर त्याची टायगर अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली जाणार असून लवकरच करार होईल, असे व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांनी सांगितले.व्याघ्र प्रकल्प मुख्यमंत्री कार्यालयाशी अटॅचमेळघाट व्याघ्र प्रकल्प हा ‘टायगर टेक’ अंतर्गत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मीडिया सेलशी जोडण्यात आला आहे. वाघांबाबतच्या घडामोडी, संरक्षण आणि संवर्धनाची माहिती कळवावी लागते. व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन, वाघांची वाढती संख्या अन्य दैंनदिन घडामोडी सीएम कार्यालयाला कळवाव्या लागतात, अशी माहिती टायगर क्राईम सेलचे उपवनसंरक्षक माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शरीरसौष्ठवपटू विजय भोयर टायगर अॅम्बेसिडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:46 AM
येथील शरीरसौष्ठवपटू विजय भोयर याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने टायगर अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. तो वाघांचे संगोपन, संरक्षणासाठी प्रचार व प्रसार करणार असून, लवकरच तसा करार होणार आहे.
ठळक मुद्देबँकॉक येथे रजतपदक विजेता : वाघांचे संगोपन, संरक्षणासाठी करणार प्रचार व प्रसार