प्रदीप भाकरे/अमरावती :आॅनलाईन लोकमतराज्यात अनेक ठिकाणी अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक कार्यरत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्य पर्यवेक्षकीय मंडळाच्या बैठकीनंतर आरोग्य सेवा आयुक्तांनी सर्व महापालिका आयुक्तांना तपासणीचे निर्देश दिले.बोगस डॉक्टर शोधून काढण्यासाठी स्थापन केलेल्या समितीसह महापालिका व पोलिसांच्या मदतीने ही मोहीम राबविली जाईल. २६ आॅक्टोबरचे हे निर्देश अमरावती महापालिकेला प्राप्त झाले असून, त्याअनुषंगाने सर्व वैद्यकीय व्यावसायिकांच्या अर्हतेची तपासणी पूर्ण झाली नसल्यास विशेष मोहीम हाती घेण्यात येईल.राज्य पर्यवेक्षकीय मंडळाची २२ आॅगस्ट रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत महापालिका हद्दीत बोगस डॉक्टरांवर मोहिमेदरम्यान व तद्नंतर नियमित कारवाई करण्याची चर्चा झाली. त्यात बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमार्फत बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी उपाययोजना सूचविण्यात आल्यात. त्यानुसार, समितीने विशेष मोहीम हाती घ्यावी. तपासणीत अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईचे अभियान संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्तांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना पाठविलेल्या या पत्रात बोगस डॉक्टरांवर केल्या जाणाºया कारवाईचाही ऊहापोह केला आहे.नोंदणी बंधनकारकवैद्यकीय व्यावसायिक कोणत्याही वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत नसल्यास अधिनियम १९६१ अन्वये असा वैद्यक महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय करू शकत नाही. नोंदणी न करता वैद्यकीय व्यवसाय करताना आढळल्यास अधिनियमाच्या कलम ३३ व ३३ अ अन्वये गुन्ह्यास पात्र ठरतो.१० वर्षे सश्रम कारावासअशा प्रकारचे गुन्हे अधिनियमाच्या कलम ३८ अन्वये दखलपात्र व गैरजमानतीचे असून, पहिल्या गुन्ह्यासाठी कमीत कमी दोन व जास्तीत जास्त ५ वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि कमीत कमी २ ते १० हजारांपर्यंत दंड, तर दुसऱ्यांदा १० वर्षांपर्यंत सश्रम कारावास व कमीत कमी १० ते २५ हजारापर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. त्याचप्रमाणे अधिकृत वैद्यकीय व्यावसायिक असल्याचे भासवून उपचार करणाऱ्याविरुद्ध भादंविच्या कलम ४१९ व ४२० अन्वये फसवणूक व कलम ४६५ आणि ४६८ अन्वये बनावट दाखला बाळगल्याबाबत गुन्हा होऊ शकतो.बोगस डॉक्टर शोधून काढण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार विशेष मोहीम हाती घेऊन असे अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक शोधून काढले जातील.- सीमा नैताम,वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका, अमरावती
राज्याच्या महापालिका क्षेत्रांमध्ये होणार ‘बोगस’ डॉक्टरांचे ‘सर्चिंग’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 4:01 PM
राज्यात अनेक ठिकाणी अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक कार्यरत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्य पर्यवेक्षकीय मंडळाच्या बैठकीनंतर आरोग्य सेवा आयुक्तांनी सर्व महापालिका आयुक्तांना तपासणीचे निर्देश दिले.
ठळक मुद्देआयुक्तांना निर्देश वैद्यकीय व्यावसायिकांच्या अर्हतेची तपासणी