शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

बोहरा ब्रदर्सने केली अडीच हजार टॅबलेटची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 10:28 PM

रायली प्लॉट स्थित दवा बाजारातील बोहरा ब्रदर्सने २ हजार ५०० बनावट गोळ्यांची विविध ठिकाणी विक्री केल्याचे अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. बोहरा ब्रदर्सवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासाकरिता कोतवाली पोलीस इंदूरला जाणार आहे.

ठळक मुद्देबनावट औषधीचे प्रकरण : इंदूरला जाणार कोतवाली पोलीस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रायली प्लॉट स्थित दवा बाजारातील बोहरा ब्रदर्सने २ हजार ५०० बनावट गोळ्यांची विविध ठिकाणी विक्री केल्याचे अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. बोहरा ब्रदर्सवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासाकरिता कोतवाली पोलीस इंदूरला जाणार आहे.तेथील इशिता फार्माचे मालक प्रवीण नारायण वर्मा यांना ताब्यात घेऊन चौकशी करणार आहे. गुरुवारी अन्न व औषधी प्रशासनाचे निरीक्षक चंद्रमणी डांगे यांनी कोतवाली पोलिसांकडे बनावट औषधी विक्रीसंदर्भात तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी दवा बाजारातील बोहरा ब्रदर्सचे महेश जयंतीलाल बोहरा, उमेश जयलाल बोहरा, राजेश बोहरा यांच्यासह इंदूरच्या इशिता फार्माचे मालक प्रविण वर्माविरुद्ध फसवणुकीसह औषधी द्रव्य सांैदर्यप्रसाधन अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला. एफडीएने बोहरा ब्रदर्सच्या दुकानातील 'सेफा ओ' नावाच्या अ‍ॅन्टीबायोटिक गोळ्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले. तपासणीनंतर त्या टॅब्लेटमध्ये ‘सेफीझिन’ व ‘ओ फॅक्सेझिन’ हे घटक असणे आवश्यक होते. मात्र, त्यात 'पॅरॉसिटॉमाल'चे अंश आढळून आले. पॅरॉसिटॉमाल ही े औषधी तापनिरोधक आहे.‘सेफा ओ ’मध्ये पॅरासिटामॉल आढळून आल्याने ती औषधी बनावट असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला. बोहरा ब्रदर्सने ‘सेफा ओ’ टॅबलेटचे २५ बॉक्स इंदूरच्या इशिता फार्मा येथून ११ हजार ८९३ रुपयांमध्ये खरेदी केले होते. प्रत्येक बॉक्समध्ये दहा स्ट्रीप असून प्रत्येक स्ट्रीपमध्ये दहा गोळ्या अशा २,५०० गोळ्या बोहरा ब्रदर्सने चांदूरबाजार, स्थानिक बालाजी एजन्सी, व लोणीतील माउली मेडिकलला विकल्या. त्यामुळे २० रुपयाला एक याप्रमाणे ‘सेफा ओ’ या गोळ्यांची विक्री करण्यात आली. बनावट औषधींचा पदार्फाश झाल्यानंतर ही संबधित औषधी विक्रेत्यांनी विक्री सुरुच ठेवल्याने ‘सेफा ओ’ टॅबलेटचा माल परत बोलाविता आला नाही. यावरून या गोळ्या अनेक ग्राहकांना विकण्यात आल्याचे निरीक्षण एफडीएने नोंदविले. मात्र, ‘सेफा ओ’चा त्या रुग्णांवर काय प्रभाव पडला असावा, ही बाब उघड होईल तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.इन्फेक्शनच्या उपचारासाठी वापरात 'सेफा ओ'‘सेफा ओ’ हे अँटिबायाटिक टॅबलेट मानवी शरीरावर विविध कारणाने होणारे इन्फेक्शनच्या उपचारासाठी वापरले जाते. डॉक्टर ‘सेफा ओ’ टॅबलेट प्रिस्क्रिशनवर लिहून देतात. त्याद्वारेच मेडिकलमधून ही औषधी विक्री केली जाते. मात्र, बनावट ‘सेफा ओ’ टॅबलेटमध्ये पॅरासिटामॉलचे काही घटक आढळून आले असून, ती इन्फेक्शनच्या उपचारासाठी वापरणे नियमबाह्य ठरते. एफडीएने घेतलेले ‘सेफा ओ’च्या नमुन्यावर उत्पादन तारीख ८/२०१६ तर एक्सापायरी तारीख जुलै २०१८ आहे. त्यामुळे पुढील महिन्यात त्या गोळ्या कालबाह्य होणार होत्या.बोहरा ब्रदर्सने इंदूरच्या इषिता फार्मातून २५ बॉक्स ‘सेफा ओ’ टॅब्लेट ११ हजार८९३ रुपयांमध्ये खरेदी केल्याचे देयक उपलब्ध आहे. त्या टॅबलेट जिल्ह्यातील तिन मेडिकलमधून रुग्णांना विक्री करण्यात आल्या. त्यामुळे तो माल परत बोलाविता आला नाही.- चंद्रमणी डांगे, औषधी निरीक्षक, एफडीए.