शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोजसाठी बोंबाबोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:13 AM

अमरावती : शासनाद्वारे १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना लस देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, यापूर्वी ज्या नागरिकांनी पहिला ...

अमरावती : शासनाद्वारे १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना लस देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, यापूर्वी ज्या नागरिकांनी पहिला डोज कोव्हॅक्सिनचा घेतला आहे, त्यांची विहित मुदत संपत असताना डोज उपलब्ध झालेला नसल्यामुळे सगळीकडे बोंबाबोंब सुरू झाली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. यावेळी लाभार्थींची संख्यावाढ झाल्यामुळे आरोग्य विभागाद्वारे केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली. अगदी गावपातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण सुरू करण्यात आले. ऑनलाईन प्रक्रियेसाठी आवश्यक ती सुविधा देण्यात आली. त्यानंतर चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील कॉमार्बिड रुग्णांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या प्रकारातील लसींचे डोज उपलब्ध करण्यात आले आहेत. सुरुवातीला कोव्हॅक्सिनचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला. त्यानंतर मात्र कोविशिल्डचेच डोज उपलब्ध करण्यात आल्याने कोव्हॅक्सिनची बहुतांश केंद्रे बंद पडली व या केंद्रांवर कोविशिल्डचे डोज उपलब्ध करण्यात आले. मात्र, ज्या व्यक्तींनी पहिला डोज कोव्हॅक्सिनचा घेतलेला आहे, त्यांना चार ते पाच आठवड्यांच्या आत दुसरा डोज कोव्हॅक्सिनचाच घेणे आवश्यक असताना, तो उपलब्ध नसल्याने आता ओरड सुरू झालेली आहे. आता २८ एप्रिलला शहरातील दोन-चार केंद्रांवर ही लस उपलब्ध करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बॉक्स

कोविशिल्डने २,१८,१३४ नागरिकांचे लसीकरण

जिल्हा प्रशासनाचे माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत कोविशिल्डचे २,३२,९८० डोज उपलब्ध करण्यात आले. यामध्ये २,१८,१३४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दिलेल्या उद्दिष्टाच्या ही टक्केवारी ४१ आहे. यामध्ये १,८४,०३१ व्यक्तींनी पहिला व ३४,१०३ व्यक्तींनी मंगळवारपर्यंत दुसरा डोज घेतला. सोमवारी पुन्हा २५ हजार डोज उफलब्ध करण्यात आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

बॉक्स

कोव्हॅक्सिनचे ५४,९२० डोज जिल्ह्यास उपलब्ध

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यास कोव्हॅक्सिनचे ५४,९२० डोज उपलब्ध करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत ४७,६०३ नागरिकांचे लसीकरण झाले. पहिल्या टप्प्यात ४३,३२३ व दुसऱ्या टप्यात ४,२८० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. अद्याप ३९,०४३ नागरिकांनी दुसरा डोज घ्यायचा असताना लसीचा पुरवठा होत नसल्याचे वास्तव आहे.

कोट

कोव्हॅक्सिनच्या दोन लाख डोजची मागणी शासनाकडे केली आहे. त्याच्या तुलनेत सोमवारी पाच हजार डोज मिळाले आहेत. ज्यांनी पहिला डोज घेतला आहे, त्यांना दुसरा डोज मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी