लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीयाच्या वसतीगृहात घडलेल्या श्वानभक्षण प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट आहेत. राजापेठ पोलिसांनी श्वानभक्षण प्रकरणाकडे गांभीर्याने बघितले नसून त्यांची अकार्यक्षम कार्यशैली यानिमित्ताने उघड झाली आहे.राजापेठ झोनचे सहायक पोलीस आयुक्त यशुदास गोर्डे यांच्यावर असमाधानकारक कामकाजाचा 'डिफॉल्ट' अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला जाणार आहे. गोर्डे यांच्या मार्गदर्शनात राजापेठ पोलीस काम करतात. गुन्ह्यांचा उलगडा करणे यासाठी एसीपी दर्जाचा अधिकारी मार्गदर्शन करीत असतो. गोर्डे यांचीच कार्यक्षमता संशयाच्या भोवºयात असताना त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाºयांची कार्यशैली प्रभावी कशी असणार?राजापेठचे ठाणेदार किशोर सुर्यवंशी यांनी श्वानभक्षण प्रकरणी अज्ञातांविरुध्द गुन्हे दाखल केलेत. मात्र, पुढील तपासाचे काय? आरोपींना अटक केव्हा करणार? पुरावे नष्ट होईपर्यंत तपास शिथिल का ठेवण्यात आला? पोलीस कुण्या दबावात आहेत का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. प्राणीप्रेमी संघटनांनी आता याप्रकरणी दिल्लीपर्यंत आवाज बुलंद केला आहे. परप्रांतीयांच्या वसतिगृहात शंभरावर विद्यार्थी वास्तव्यास आहेत. ेते नियमितपणे श्वान आणि इतर प्राण्यांचे सेवन करीत असल्याची बाब श्रीनाथवाडी परिसरात घरोघरी ठाऊक आहे. आरोपी शोधणे कठीण नाहीच, असा विश्वास त्या परिसरातील नागरिकांचा आहे. पोलीस आरोपींना अभय देत असल्यानेच ते मोकाट आहेत.क्लेशानेही न विरघळणारी प्राणीक्लेश समितीजिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त मोहन गोहोत्रे यांनी जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची भेट घेतली. आगामी सण-उत्सवाचे दिवस बघता या बैठकीसाठी जिल्हाधिकाºयांना सप्टेंबर महिन्यात वेळ मिळेल. श्वान तडफडून मेले; परंतु जिल्हा प्राणी क्लेश समितीच्या अध्यक्षांना 'प्राणीक्लेश' अस्वस्थ करीत नाही.
श्वानभक्षण करणारे मोकाटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 11:16 PM
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीयाच्या वसतीगृहात घडलेल्या श्वानभक्षण प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट आहेत.
ठळक मुद्देतपास की दिखावा : अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह