परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नोकर भरती प्रक्रिया राबविणाऱ्या केएनके टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या दोन संचालकांना अटक करण्यात आली. अचलपूर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली. योगेश महादेव खंडारे (३७, रा.साई नगर अमरावती) व गौरव नारायण वैद्य (२७, गणेशनगर, परतवाडा) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
बाजार समितीत भरती प्रक्रिया राबविताना अनियमितता केल्यावरून परतवाडा पोलिसांनी बाजार समितीचा सहाय्यक सचिव व शिपाइ शैलेश शुक्ला व लता राकेश वाजपेयीविरुद्ध २१ डिसेंबर रोजी गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. त्याच कलमांतर्गत शनिवारी केएनके कंपनीच्या दोन्ही संचालकांना अचलपूर पोलिसांनी अटक केली.
बॉक्स
महिला आरोपीस अटकपूर्व जामीन
नोकर भरती प्रकरणात सर्वप्रथम गुन्हे दाखल झालेल्या आरोपी महिला कर्मचारी लता राकेश वाजपेयी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन दिला. मात्र, अन्य आरोपी सहायक सचिव मंगेश सुभाष भेटाळू, शिपाई शैलेश शुक्ला मात्र अजूनही पसारच आहे. दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात संचालक मंडळावरसुद्धा गुन्हे दाखल होण्याची शक्यता बळावली आहे.