लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : भारताच्या सर्व खेड्यांची सुधारणा झाल्याशिवाय देश सुधारला, असे म्हणतात येणार नाही. राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व्हायला हवे. तरच भारत प्रगत राष्ट्र झाले, असे मानता येईल. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील तत्त्वज्ञान आजही प्रासंगिक असून ते कायम मार्गदर्शक ठरणारे आहे, असे प्रतिपादन नीळकंठ हळदे महाराज यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवातील ग्राह्यगीता प्रवचनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. नीळकंठ हळदे म्हणाले, राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहून ग्राम सुधारणेच्या कामात मोलाची मदत केली. त्याचा उपयोग करीत खेडी ही स्वयंपूर्ण घटक होऊन व भारत वैभवसंपन्न होऊ शकतो. पुण्यतिथी महोत्सवात ७ आॅक्टोबरच्या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे सामुदायिक ध्यानाने झाली. यावेळी प्रा.नरेंद्र पाटेकर यांनी विचार व्यक्त केले. त्यानंतर योगासन व प्राणायाम व सायंकाळच्या सत्रात सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली.सुशील वणवे यांनी यावेळी सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व विशद केले. भाष्कर निकम यांच्या संयोजनाखाली खंजेरी भजन, नागपूर येथील ॠचा देव यांच्या संस्कृत गीतरामायणाने श्रोत्यांची मने रिझवली. शेगावचे कीर्तनकार आखरे यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
-तरच भारत बनेल स्वयंपूर्ण राष्टÑ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 11:22 PM
भारताच्या सर्व खेड्यांची सुधारणा झाल्याशिवाय देश सुधारला, असे म्हणतात येणार नाही.
ठळक मुद्देराष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव : नीळकंठ हळदे महाराज यांचे प्रबोधन