लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळाकडे जाणारे दोन्ही मार्ग खड्ड्यांत गेले आहेत. वनविभागाच्या परवानगीअभावी रस्त्याचे काम बंद आहे. परिणामी हे रस्ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरले आहेत. प्रशासनाच्या वारंवार होणाऱ्या बैठकी पूर्णत: फोल ठरल्या आहेत. शासकीय व दैनंदिन कामासाठी येणाऱ्या आदिवासींना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.चिखलदरा पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी परतवाडा, धामणगाव गढी व परतवाडा-घटांग-सलोना असे दोन मार्ग आहेत. दीड वर्षांपासून या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याचे नूतनीकरण व नव्याने चौपदरीकरण मंजूर आहे. परंतु, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा वाढलेला परिसर आणि वनविभागाच्या परवानगीअभावी रस्त्याचे काम पूर्णत: रखडले आहे. त्याचा फटका तालुका मुख्यालयाला येणाऱ्या गोरगरीब आदिवासींना बसत आहे. दररोज अपघातांची मालिका सुरू आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा परिसर गतवर्षापासून वाढविण्यात आला. त्याआधीपासून हे रस्ते अस्तित्वात आहेत. परिसर वाढताच व्याघ्र प्रकल्पाने आपले नियम लागू केले. त्यामुळे मेळघाटातील विकास आता खुंटला आहे.एकीकडे पर्यटनस्थळाच्या विकासासाठी ५०० कोटींपेक्षा अधिक निधी मागील शासनाने मंजूर केला. त्यातून स्काय वॉकसारख्या मोठ्या प्रकल्पाची निर्मिती सुरू आहे. दुसरीकडे रस्ता चौपदरीकरण व दुरुस्तीच्या परवानगीसाठी मेळघाट ते मुंबई अशा प्रशासन आणि मंत्र्यांच्या सतत होत असलेल्या बैठकांवर बैठका निष्फळ ठरल्या आहेत. यापुढे पर्यटनस्थळावरील रस्त्यांचे भविष्य उज्ज्वल होणार की अंधकारमय राहील, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.वनमंत्री ते विरोधीपक्षनेते याच मार्गानेविदर्भाच्या नंदनवनात पंधरा दिवसांत माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व त्यापूर्वी वनमंत्री संजय राठोड येऊन गेले. त्यांनासुद्धा या खडतर रस्त्याचा फटका बसला.
पर्यटनस्थळावरील दोन्ही मुख्य मार्ग खड्ड्यांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 5:00 AM
चिखलदरा पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी परतवाडा, धामणगाव गढी व परतवाडा-घटांग-सलोना असे दोन मार्ग आहेत. दीड वर्षांपासून या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याचे नूतनीकरण व नव्याने चौपदरीकरण मंजूर आहे. परंतु, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा वाढलेला परिसर आणि वनविभागाच्या परवानगीअभावी रस्त्याचे काम पूर्णत: रखडले आहे.
ठळक मुद्देवनविभागाची आडकाठी; स्कायवॉकला नेण्यासाठी रस्ता कुठे? बैठका विनानिर्णय