येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयानजीक तसेच उर्ध्व वर्धा कर्मचाऱ्यांच्या वसाहत परिसरात मद्यपि रात्री दरम्यान येथेच्छ दारु ढोसतात. त्यामुळे दारुच्या खाली बॉटल परिसरातील सिंचन विभागाच्या कार्यालयाच्या इमारतीजवळ फेकून देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिसरात फेरफटका मारला असता अनेक ठिकाणी दारुच्या रिकाम्या बॉटलचा खच तसेच खाली डिस्पोजेबल ग्लास आढळून आले.
या परिसरात बाहेरील टवाळखोरांचा सुद्धा शिरकाव होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे येथील वसाहतमध्ये राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांची सुरक्षा सुद्धा धोक्यात आली आहे. त्यामुळे परिसरात रात्री दरम्यान सुरक्षा रक्षक नेमले पाहिजे तसेच परिसरात महत्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे सुद्धा लावण्याची मागणी होत आहे.
उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंताच्या ईमारतीच्या मागील बाजुला शौचालयाजवळ काही दारुच्या बॉटल्स फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. तसेच अधिक्षक अभियंता व परीमंडळीय अधिकारी दक्षता पथक अमरावती परीमंडळ कार्यालयाच्या ईमारतीच्या मागे दारुच्या बॉटल्स आढळून आल्या. तसेच परिसरात अनेक नाल्यांमध्ये तसेच परिसरात अनेक ठिकाणी दारुच्या बॉटल्स मिळून आल्या. याचा अर्थ की या ठिकाणी अंधाराचा फायदा घेवून मद्यपी ओल्या पार्ट्या झोडतात. त्यानंतर दारुच्या रिकाम्या बॉटल्स येथेच फेकून देतात. त्यामुळे यावर नियंत्रण कुणाचे याच परिसरात, दोन्ही मुख्य अभियंता, दोन्ही अधिक्षक अभियंता तसेच तीन कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय आहेत. तसेच सबडिव्हीजन सुद्धा आहे. तसेच अधिक्षक अभियंत्याच्या दालनाजवळ जलसंपदा राज्यमंत्री बच्चु कडू यांचे जनसंपर्क कार्यालय सुद्धा आहे. त्यामुळे रात्रकालीन परिसरात अनेक सुरक्षा रक्षक नेमणे गरजेचे असताना बोटावर मोजण्याईतकेच सुरक्षा रक्षक आहेत. त्यामुळे बाहेरील लोकांचा वावर वाढला आहे. तसेच काही कर्मचारी सुद्धा या ठिकाणी दारु ढोसत असल्याची माहिती आहे.
कोट आहे.