शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

हद्द नगर परिषदेची, बांधकाम परवानगी ग्रामपंचायतीची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2022 5:00 AM

खेल खडसेमधील सर्व्हे क्र. ४ मधील काही मालमत्ताधारकांना कराची वसुली व बांधकाम परवानगी टाकरखेडा मोरे ग्रामसचिवाकडून  मिळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर  गटविकास अधिकाऱ्यांनी दखल घेतली. अंजनगाव सुर्जी मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानुसार  राजपत्रातील आदेशान्वये प्रकरणाची चौकशी करून व वस्तुस्थिती लक्षात घेऊन गटविकास अधिकाऱ्यांनी टाकरखेडा मोरे येथील ग्रामसचिवांच्या नावाने लेखी आदेश काढले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : शासन निर्णयानुसार अंजनगाव सुर्जी नगर परिषदेची हद्दवाढ १ जून २००२ पासून झाली आहे. त्यामध्ये आजूबाजूच्या एकूण दहा मौलातील विविध सर्व्हे क्रमांकाचा समावेश झाला आहे. यात टाकरखेडा मोरे रोडवरील खेल खडसेमधील सर्व्हे क्र. ३ व ४ चा समावेश आहे.खेल खडसेमधील सर्व्हे क्र. ४ मधील काही मालमत्ताधारकांना कराची वसुली व बांधकाम परवानगी टाकरखेडा मोरे ग्रामसचिवाकडून  मिळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर  गटविकास अधिकाऱ्यांनी दखल घेतली. अंजनगाव सुर्जी मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानुसार  राजपत्रातील आदेशान्वये प्रकरणाची चौकशी करून व वस्तुस्थिती लक्षात घेऊन गटविकास अधिकाऱ्यांनी टाकरखेडा मोरे येथील ग्रामसचिवांच्या नावाने लेखी आदेश काढले. यामध्ये सर्व्हे क्र. ४ हा नगर परिषदेच्या हद्दीत असल्यामुळे तेथील मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कर वसूल करण्यात येऊ नये, असे त्यात नमूद आहे. तथापि, ग्रामसचिवाकडून मालमत्ता कर वसुली व बांधकाम परवानगी देणे सुरू आहे, असे निदर्शनात आले आहे.  नव्यानेच ग्रामसचिवाने २१ फेब्रुवारी रोजीच्या आदेशाने एका प्लाॅटवर बांधकाम परवानगी दिली. यावरून गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांच्या लेखी आदेशाला येथील ग्रामसचिवाने केराची टोपली दाखवल्याचे निदर्शनात आले आहे. नव्याने समाविष्ट वसाहतींमध्ये नागरी सुविधा नगर परिषदेमार्फत पुरवण्यात येतात; परंतु उत्पन्न हे ग्रामपंचायतीला मिळत आहे. यात वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सन २००२ पासून अंजनगाव नगर परिषदेचा अंमलसन २००२ पासून सर्व्हे क्रमांक ४ हा भाग राजपत्रित आदेशामध्ये  नगर परिषद हद्दीत असल्याचे नमूद आहे. त्याबाबतच्या आदेशानुसार आम्ही नगर परिषदेमार्फत ग्रामसचिवांना लेखी पत्राद्वारे सूचित केले, तरीही ग्रामसचिव त्या परिसरातील नागरिकांना  बांधकाम व इतरही परवानगी देत आहेत.  त्याबाबत वरिष्ठ स्तरावर तक्रार करणार असल्याचे कर अधीक्षक विजय भोंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ग्रामसचिव बंड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत