शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

पतंगाचा नाद जीवावर बेतला, ३० तासानंतर मृतदेहच मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2021 6:09 PM

पतंगाचा नाद एका मुलाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. बेपत्ता झाल्याच्या ३० तासानंतर त्याचा मृतदेहच एका खचलेल्या व झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत आढळून आला.

ठळक मुद्देबालकाचा विहिरीत पडून मृत्यू

अमरावती :पतंगाचा नाद एका बालकाच्या जिवावर बेतल्याची हृद्यद्रावक घटना बुधवारी रात्री राजापेठ भागात उघड झाली. बेपत्ता झाल्याच्या ३० तासानंतर त्याचा मृतदेहच एका खचलेल्या व झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत आढळून आला. दरम्यान त्याच्यावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

वैभव श्रीकांत आकोडे (१५, जुना कोंडवाडा, राजापेठ) असे मृताचे नाव आहे. राजापेठ कोंडवाड्यापासून सुमारे १ किमी अंतरावरील जयरामनगर येथील एका विहिरीत ८ डिसेंबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. ७ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास सायकल घेऊन घरबाहेर पडलेला वैभव परत न आल्याने त्याच्या आईने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. रात्री ११.५२ च्या सुमारास गुन्हा दाखल करत राजापेठ पोलिसांनी चौकशीस सुरुवात केली.

त्या भागातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये वैभव हा सायकलने जयरामनगर भागाकडे जाताना दिसतो. तो धागा पकडून ठाणेदार मनीष ठाकरे यांनी वैभवच्या कुटुंबीयांसह त्या भागाचा कानाकोपरा शोधून काढला. दरम्यान त्या भागात दुपारी काही मुले पतंग उडवत होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान, पतंग मिळवण्याच्या नादात धावताना वैभवने त्याची सायकल एका भिंतीलगत उभी करून ठेवली होती. सायंकाळपर्यंत ती तशीच राहिल्याने तेथील एका स्थानिकाने ती आपल्या घरात सुरक्षित ठेवली. दरम्यान, ८ डिसेंबर रोजी त्यांनी ती सायकल ज्या ठिकाणी होती, त्याच ठिकाणी आणून ठेवली.

बुधवारी सायंकाळी ती सायकल वैभवची असल्याचे कुटुंबीयांनी ओळखले. त्यामुळे त्याच भागात शोधकार्य करण्यात आले. दरम्यान, वैभवच्या वडिलांचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले असून, त्याची आई घरकाम करते. मोठी बहीण आयटीआय शिक्षणासाठी औरंगाबाद गेलेली होती. मंगळवारी दुपारी ५ च्या सुमारास कामावरून परतल्यानंतर वैभव सायकल घेऊन बाहेर गेल्याची माहिती त्याच्या आईला मिळाली होती.

अग्निशमनची मदत

ठाणेदार मनीष ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत त्या भागातील नाले, विहिरी पिंजून काढल्या. जयरामनगरात ज्या ठिकाणी सायकल आढळली, तेथे शोध घेत असताना त्या भागात खचलेली विहीर झाडाझुडुपांनी वेढल्याची माहिती ठाकरे यांना मिळाली. मोठ्या टॉर्च घेऊन त्या विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यात केवळ मानवी केस आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी ती विहीर लक्ष्य करीत महापालिकेच्या अग्निशमन विभागाची मदत घेतली. अखेर बुधवारी रात्री ११.१५ च्या सुमारास त्यातून मृतदेह हाती लागला. त्या मृतदेहाची ओळख वैभव आकोडे म्हणून पटविण्यात आली. तो गाळात फसला होता.

टॅग्स :AccidentअपघातkiteपतंगDeathमृत्यू