लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या शहरातील ‘नाईट राऊंड’चा दबदबा कायम असून सोमवारी त्यांनी बेलपुºयात सर्च आॅपरेशन राबविले. यामध्ये बेलपुरा परिसरातील १३ घरांची झडती घेण्यात आली असून त्यापैकी आरोपी योगेश धर्माळे नामक इसमाच्या भाड्याच्या खोल्यांमध्ये दारूचा अवैध साठा व काही संशयास्पद साहित्य आढळून आले. पोलिसांनी योगेश धर्माळेसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली असून अवैध दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस आयुक्तांसह राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी व अन्य पोलिसांनी सोमवारी रात्री बेलपुरा परिसराची झडती घेतली. त्याठिकाणी योगेश धर्माळे नामक एका इसमाच्या खोलीमध्ये भाजीपाल्यासह दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्यात. भाजीपाल्याच्या व्यवसायाआड धर्माळे हा देशी दारूची अवैध विक्री करीत असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी धर्माळेच्या घरातील अन्य खोल्यांची झडती घेतली असता एका खोलीत देशी दारूच्या ९४ बाटल्या व अन्य खोलीत सतंरजी आढळून आली. त्यामुळे धर्माळे हा जुगार व्यवसाय देखील करीत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी धर्माळेसह त्यांच्या दोन साथीदारांना अटक केली असून आठ जणांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलिसांनी बेलपुºयातील विविध आरोपींकडून देशी दारूच्या १२५ बाटल्या जप्त केल्या आहेत. या कारवाईदरम्यान पीएसआय साबीर शेख हे पाय घसरून पडल्याने जखमी झालेत. त्यांना उपचारार्थ रूग्णालयात नेण्यात आले.सीपींनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. सर्वत्र सीपींच्या नाईट राऊंडची चर्चा आहे.घरमालकही होणार आरोपीमहादेव खोरी परिसरातील योगेश धर्माळे हा बेलपुºयात भाड्याने खोल्या घेऊन अवैध व्यवसाय करीत होता. त्यामुळे याप्रकरणात घरमालकसुद्धा जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनाही आरोपी करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी राजापेठ पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना दिलेत.
बेलपुºयात सीपींचे सर्च आॅपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 10:36 PM
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या शहरातील ‘नाईट राऊंड’चा दबदबा कायम असून सोमवारी त्यांनी बेलपुºयात सर्च आॅपरेशन राबविले.
ठळक मुद्दे१३ घरांची झडती, दारुचा मुद्देमाल जप्त : योगेश धर्माळेसह तिघांना अटक