लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरसकट प्लास्टिक बंदीमुळे कचरा व्यवस्थापनाची समस्या सुटणार नाहीत, उलट वाढणार आहेत. मुळात ही समस्या प्लास्टिकची नसून, कचरा वर्गीकरण आणि हाताळण्याची आहे. त्यामुळे प्रस्तावित प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला विरोध करीत असल्याचे मत शुक्रवारी आयोजित बैठकीत अमरावती प्लास्टिक असोसिएशनने मांडले. खा. आनंदराव अडसूळ व आ. सुनील देशमुख यांच्या उपस्थितीत सर्कीट हाऊसला ही बैठक पार पडली.प्लास्टिक बंदीमुळे जनसामान्याचे जीवन आणि व्यापार कोलमडतील. प्लास्टिक मानवी जीवनासाठी अत्यावश्यक गरजेचे साधन बनले आहे. प्लास्टिक पॅकिंगची व्याप्ती खूप मोठी झाली असून, दैनदिन जीवनात प्लास्टिक पॅकिंगशिवाय पर्याय उरला नाही. प्लास्टिक बंदीमुळे किराणा माल, मिठाई दुकान, हॉटेल, धनधान्यांचे नुकसान, फूड प्रोसेसिंग इंडस्टिज आणि साठा, शॉपींग मॉल, महिला गृहउद्योग, गारमेंट इंडस्ट्रिज, साडी, ड्रेड मटेरियल, सैनिक भोजनाचे पॅकिंग, शालेय पोषण आहार, सैन्याच्या दारूगोळा, फ्लेक्स बोर्ड, स्टेशनरी यावर मोठा परिणाम पडणार आहे. यावर पर्याय म्हणून कागदी व कापडाचा वापर करणे हे पर्यावरणासाठी अधिक धोकादायक ठरणार आहे. कागदाचा उपयोग केल्यास वृक्षतोड अधिक होईल तसेच ग्लोबल वॉर्मिंग मोठी समस्या येईल. प्लास्टिक बंदीमुळे बेरोजगारी वाढेल आणि करविषयक आर्थिक नुकसानाचा होईल आदी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी खा. अडसूळ व आ. देशमुख यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. प्लास्टिक असोसिएशनचे विनोद सावरा, महेंद्र दलवानी, जयराम चव्हाण, पवन कुकरेजा, संदीप इंगोले, दामोदर बजाज, महेश सारडा, मनोज कोठारी, दीपक पाटमासे, इंदर सेपानी, प्रिंटिंग असोसिएशनचे रणजित मेश्राम, राजू शेरेकर, कमलेश घायर, दीपक पाटे, संजय बारड, गणेश, तडोकार, दिलीप वंजारे, सचिन सोनोने, योगेश जवंजाळ आदी उपस्थित होते.दुग्धव्यवसायावर परिणामप्लास्टिक बंदीमुळे शहरातील बहुतांश व्यवसाय २२ मार्चपासून बंद ठेवण्यात आले आहेत. दूध विक्रेता, डेअरीवाले प्लास्टिक बंदीच्या विरोधात एकत्र येऊन पंधरा दिवसानंतर डेअरी बंद ठेवण्याच्या विचारात आहे. दुधासारख्या नाशवंत पदार्थ विक्रीसाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर अधिक केला जातो. त्यामुळे बंदीचा प्रभाव दुग्धव्यवसायावर होणार आहे.
प्लास्टिक बंदीविरोधात मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 10:40 PM
सरसकट प्लास्टिक बंदीमुळे कचरा व्यवस्थापनाची समस्या सुटणार नाहीत, उलट वाढणार आहेत. मुळात ही समस्या प्लास्टिकची नसून, कचरा वर्गीकरण आणि हाताळण्याची आहे.
ठळक मुद्देखासदार, आमदारांची बैठक : पुनर्विचारासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार