शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

सरपंचासाठी चढाओढ; मात्र सदस्यसपद कुणालाच नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 9:45 PM

केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपने विकासाच्या विकेंद्रीकरणासाठी ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठीची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : उमेदवार निवडीत नेत्यांच्या नाकीनऊ

जितेंद्र दखने।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपने विकासाच्या विकेंद्रीकरणासाठी ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठीची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतेही राजकीय चिन्ह न वापरता ही निवडणूक लढविण्याचा फतवा देखील निघाल्याने राजकीय पक्षांची मोठी कोंडी झाली आहे. एकीकडे सरपंचपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होत आहे, तर दुसरीकडे सदस्यपदासाठी उमेदवार सापडेनासे झाल्याने नेत्यांच्या नाकीनऊ आले आहेत.जिल्ह्यात २५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम मागील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राजयकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे.ग्रा.पं. ताब्यात घेण्यासाठी चढाओढजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने काँग्रेस व राकाँला चांगली लढत दिली होती. मात्र, जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्यात भाजपला अपयश आले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात भाजप-काँग्रेस-सेना व अन्य पक्षांना ताकद वाढवावी लागणार आहे.ग्रामीण भागातील मतदारांची मते स्वत:कडे सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कसब पणाला लावत आहेत. मात्र, ग्रामपंचायत स्वत:च्याच ताब्यात ठेवण्यासाठी सरपंचपद मिळविण्याची नवी खेळी खेळली जात आहे. परिणामी आरक्षणानुसार सरपंचपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून सरपंचपदासाठी कोणीच इच्छुक नसल्याचे चित्र आहे. सरपंचपदावर विराजमान व्यक्तीविरूद्ध अविश्वास ठराव पारित झाल्यानंतरदेखील अन्य सरपंचाची निवड जनतेतूनच करावी लागणार असल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.छोट्या वस्त्यांमधील सदस्यांना मिळेल का संधी ?सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे. मात्र, मतदानाची आकडेमोड लक्षात घेता गट ग्रामपंचायतीत समाविष्ट वाड्यांना सरपंचपद मिळण्याची आशा धुसर झाली आहे. सरपंचाच्या थेट निवडीमुळे गट ग्रामपंचायतींमध्ये पक्ष किंवा आघाड्यांद्वारे अधिक मतदारसंख्या असलेल्या गावांमधूनच सरपंचपदाचा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे छोट्या वाड्या-वस्त्यांमधील सदस्यांना सरपंचपदाची संधी मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे. यापूर्वी सरपंचाची निवड प्रभागातील सदस्यांमधून केली जात असल्याने कोणत्याही प्रभागातील सदस्याला सरपंचपदाची संधी मिळत असे. निवडणूक झाल्यानंतर तडजोडीच्या राजकारणातून किंवा आघाडीच्या समझोत्याप्रमाणे छोट्या वाड्या-वस्त्यांमधील सदस्यांना सरपंचपद दिले जात होते. मात्र, थेट सरपंचनिवडीमुळे एकूणच समीकरणे बदलली आहेत. गट ग्रामपंचायतींमध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक वाड्या असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश असतो. आता सरपंचाच्या थेट निवडीमुळे या वाड्या-वस्त्यांमधील सदस्यांना कितपत संधी मिळेल, हे निवडणुकीनंतरच खºया अर्थाने स्पष्ट होणार आहे. गटातटाच्या राजकारणाला या निवडणुकीत अधिक रंगत येईल, हे मात्र खरे.