आॅनलाईन लोकमतबडनेरा : कन्या विद्यालयासमोरील महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलाचे दोन्ही बाजूचे लोखंडी कठडे तुटल्याने हा उड्डाणपूल वाहनचालकांसाठी धोक्याचा ठरत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघात घडू शकतो.बडनेºयातील रेल्वे स्थानकापासून थोड्याच अंतरावरील महामार्गावरील अनेक वर्षांपासूनचा उडाणपुल वाहन चालकांसाठी धोक्याचा ठरत आहे. येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. या उडान पुलाचा रस्ता व जमिनीची लेव्हल यात बरेच अंतर असल्याने दुचाकीस्वार घसरून पडताहेत. त्यातच लोखंडी कठडे तुटल्याने हा उडाणपूल धोक्याचा ठरत आहे. रात्रीला या उडानपुलावर पथदिवे नसल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. संबंधित प्रशासनाने तुटलेले कठडे तात्काळ बसवावित असे बडनेरावासीयांसह वाहन चालकांमध्ये बोलल्या जात आहे. हा उडानपुल अरूंद आहे. वाहनांची मोठी रेलचेल असल्याने विशेष करून दुचाकीस्वारांना हा उडानपुल अत्यंत धोकादायक ठरत असल्याच्या प्रतिक्रिया आहेत. प्रशासनाला याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे लागणार आहे.
उड्डाण पुलावरील तुटलेले कठडे धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 11:10 PM
कन्या विद्यालयासमोरील महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलाचे दोन्ही बाजूचे लोखंडी कठडे तुटल्याने हा उड्डाणपूल वाहनचालकांसाठी धोक्याचा ठरत आहे.
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : वाहनचालक त्रस्त