आॅनलाईन लोकमतअमरावती : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा कपाशीचे पीक उद्वस्त झाले. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीची भरपाई मिळावी, यासाठी शासनाने संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश सात डिसेंबरला देऊन एका आठवड्यात अहवाल मागितला. मात्र, या मुदतीला दोन आठवड्यांचा कालावधी होऊनही पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. सलग तीन सुट्यांमुळे पंचनाम्याचे काम बाधित झाल्याचा आरोप होत आहे.यंदाच्या खरिपात जिल्ह्यात दोन लाख ८ हजार क्षेत्रात कपाशीचे क्षेत्र आहे. पेरणी काळात अल्प पावसामुळे शेतकºयांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. यातून जी कपाशी बचावली तिच्यावर आॅक्टोबर महिण्यात पात्या फुलांवर असताना गुलाबी बोंडअळीचा अटॅक झाला. यामध्ये जिल्ह्यातील ८० टक्के कपाशी पीक बाधित झाले. हजारो हेक्टरमधील कपाशीच्या उभ्या पिकावर शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर फिरविला. शेतकऱ्यांना केंद्राच्या ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे नैसर्गिक आपत्तीची भरपाई मिळावी, यासाठी राज्य शासनाने ७ डिसेंबरला पंचनाम्याचे आदेश दिलेत. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील महसूल व कृषी विभागाला संयुक्त पंचनाम्याचे आदेश देऊन दोन दिवसांत अहवाल मागितला. आता दोन आठवडे झाले असतानाही पंचनामा व अहवाल तयार झालेला नाही. जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्यामुळेच यंत्रणा सुस्तावली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.दीड लाख हेक्टरवर क्षेत्रात प्रादुर्भावकृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात एक लाख हेक्टर बोंडअळीने बाधित झाल्याचा अहवाल शासनाला दिला. प्रत्यक्षात दीड लाख हेक्टरवरील कपाशी बाधित असल्याचे वास्तव आहे. सद्यस्थितीत पंचनाम्यांचे काम ७० टक्क्यांवरच झाले असल्याची माहिती आहे.कपाशीवरील बोंडअळीच्या नुकसानीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. येत्या दोन दिवसांत सर्व तालुक्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल.-अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
सलग सुट्यांमुळे बोंडअळीचे पंचनामे बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 10:34 PM
गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा कपाशीचे पीक उद्वस्त झाले. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीची भरपाई मिळावी,....
ठळक मुद्दे१४ डिसेंबर होती ‘डेडलाईन’ : अद्याप ७० टक्क्यांवरच रखडले काम