अमरावती - बांधकाम ठेकेदारास बिलाची उर्वरित रक्कम काढण्यासाठी लाच मागणाºया सरपंचासह सदस्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली. संजय नारायण नागोने (५०) असे सरपंचाचे व प्रफुल्ल सुधाकर भेलकर (३८, दोन्ही रा. माहुली जहागीर) असे सदस्याचे नाव आहे. नाली बांधकामाची एमबी इंजिनीअरकडून करून देणे व रस्ता बांधकामाचे उर्वरित पैसे काढून देण्यासाठी सरपंचाने बांधकाम ठेकेदाराला २४ हजारांची लाच मागितली होती. यापूर्वी दिलेल्या चार लाखांचे सहा टक्के कमिशन म्हणून ही रक्कम होती. ती रक्कम ग्रामपंचायत सदस्य प्रफुल भेलकर याच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते. याबाबत एसीबीला तक्रार प्राप्त झाल्यानंतर अधिकाºयांनी पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस उपाधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक राजवंत आठवले, सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास सानप, हवालदार श्रीकृष्ण तालन, शिपाई प्रमोद धानोरकर पंकज बोरसे, युवराज राठोड, अकबर आदित्य यांनी शुक्रवारी सापळा रचून दोघांनीही रंगेहात ताब्यात घेतले. ती रक्कम एसीबी अधिकाºयांनी जप्त केली असून, पुढील चौकशी सुरू केली आहे.
लाचखोर सरंपचासह सदस्याला अटक, एसीबीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 10:03 PM