असाईनमेंट पान ३ वर
अमरावती : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाचखोरांविरुद्ध कारवाई केली जाते. मात्र, आज अनेक जण चला काम तर होत आहे ना, या मानसिकतेमुळे लाचखोरीला बळी पडताता. मात्र, तक्रार केल्यास एसीबीकडून सापळा कारवाई केली जाते. अनेक विभागांमध्ये उघड्या डोळ्यांनी लाच दिल्याशिवाय काम होत नाही.
लाच घेणे हा एकप्रकारचा पायंडाच पडला आहे. लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडलेले अधिकारी, कर्मचारी समाजात उजळमाथ्याने वावरताना दिसतात. लाचखोरांना कुठलीही सामाजिक भान नाही. त्यामुळे हे प्रकार सुरू आहेत.
पोलीस विभाग सर्वांत पुढे
पोलीस विभागात गेल्या साडेपाच वर्षांत सर्वाधिक लाच स्वीकारण्याच्या घटना झाल्या आहेत. याठिकाणी न्याय मिळविण्यासाठी पोलिसांना साकडे घातले जाते. अगतिकतेचा फायदा घेऊन गुन्हे नोंदविण्यात येतात.
महसूल विभागाचा दुसरा क्रमांक लागतो. या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर बऱ्याच कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यानंतर ग्रामविकास विभाग, ऊर्जा विभाग, विक्रीकर विभाग यांचा क्रमांक लागतो. भ्रष्टाचार ही लागलेली कीड असून ती काही केल्या संपत नाही.
लाच दोनशेपासून दोन लाखांपर्यंत
८-अ देण्यासाठी लाच...
स्वत:च्या मालकीच्या मालमत्तेची नोंद करून त्याचा ८-अ घेण्यासाठीसुद्धा लाच द्यावी लागते. फार थोड्या प्रकरणात तक्रार देऊन कारवाई होते. जिल्ह्यातील एका महिला सरपंचाला त्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
बदलीसाठी दोन लाखांची लाच
सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी, याकरिताही लाखो रुपयांची लाच दिली जाते. काही शहरात जाण्यासाठी तर ठरावीक रकमेची बोलीच लावण्यात येते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागप्रमुखाचा कोट
लाच घेणे हे समाजस्वास्थ्यासाठी धोकादायक आहे. कोेणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास एसीबीशी तात्काळ संपर्क साधावा.
- विशाल गायकवाड, अधीक्षक, एसीबी, अमरावती
वर्षलाच प्रकरणे
२०१६ : ३१
२०१७ : २३
२०१८ : २३
२०१९ : २८
२०२०: २५
२०२१ (जुलैपर्यंत) १३