लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : तिवसा-चांदूर रेल्वे राज्य महामार्गावर असलेला कुºहानजीक भोगावती नदीवरील पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे दुरुस्त करावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुलावर मानवी साखळी तयार करून आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसांपासून या पुलावर कठडे लावण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहेत.तिवसा-धामणगाव मार्गावरील भोगवती नदीवर असलेल्या पुलावर मोठी व जड वाहतूक होते. या पुलाच्या दुसºया बाजूला शाळा व महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. वाहन पुलावरून जात असताना लहान विद्यार्थ्यांना उभे राहण्यासाठीदेखील जागा उरत नाही. पुलावर कठडे नसल्याने नदीत विद्यार्थी पडण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुलाच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले आहे. मात्र, काम झाले नसल्याने मुलांनी लक्ष वेधण्यासाठी मानवी साखळी पुलावर उभी करून आंदोलन केले.पुलाच्या बाजूचे कठडे अनेक दिवसांपासून तुटले आहे. कोणी याकडे लक्ष देत नाही. शाळा-कॉलेजचे विद्यार्थी रोज पुलावरून ये-जा करतात. वाहन आले की, मुले पुलाच्या काठावर उभे राहतात. लहान मुलांना पुलाखाली पडण्याची भीती राहते.- शुभम बाबणे,विद्यार्थी, कला व विज्ञान महाविद्यालय, कुºहा
भोगवती नदीच्या पुलाला मानवी साखळीचे कठडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:43 AM
लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : तिवसा-चांदूर रेल्वे राज्य महामार्गावर असलेला कुºहानजीक भोगावती नदीवरील पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे दुरुस्त करावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुलावर मानवी साखळी तयार करून आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसांपासून या पुलावर कठडे लावण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहेत.तिवसा-धामणगाव मार्गावरील ...
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे अभिनव आंदोलन : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष