नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील जगतपूर येथे साखळी नदीवर पूल उभारला जाणार आहे. त्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.
जुना पुल नादुरुस्त झाला होता. खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. गोळेगाव, जगतपूर-शिवरा रस्त्यावर होणाऱ्या या पुलामुळे जगतपूर, गोळेगाव, खानापूर, मलकापूर, शिवरा, पिंपळगाव निपाणी येथील नागरिक, शेतकरी, शेतमजुरांना दळणवळण सोयीचे जाणार आहे तसेच पिंपळगाव-शिवरा-जगतपूर येथील नागरिकांना नजीकच्या यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपंत जाण्यासाठी या पुलामुळे अंतर कमी होणार आहे.सेवादल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर बगळे व नागरिकांनी येथील पूल नवीन पूल उभारावा, अशी मागणी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्याकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्याने येथील पुलाला मंजुरात मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
290721\1334-img-20210729-wa0007.jpg
जगतपुर येथे साखळी नदीवर उभारणार.