अंजनगाव सुर्जी : शहरातील कम्मुपुरा येथील मो. इक्बाल मो. अकबर (३०) या ऑटोरिक्षाचालकाला टाकरखेडा मोरे येथील पेट्रोल पंपावर अनिकेत गजानन बेले (२०) व कुणाल चंद्रशेखर मोरे (१९) यांनी काठीने मारहाण केली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
-----------
अपघातप्रकरणी शिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा
शिरजगाव कसबा : खरपी ते बहिरम मार्गावर २८ फेब्रुवारी रोजी एमएच २७ सीके ९७६९ क्रमांकाच्या दुचाकीवरील स्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्याचा अमरावती येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी मो. अर्शील मो. शरीफ (२१) याच्या तक्रारीवरून २३ मार्च रोजी याप्रकरणी भादंविचे कलम २७९, ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला.
---------
ब्राह्मणवाडा शिवारातून दुचाकी लंपास
ब्राह्मणवाडा थडी : देवानंद रूपराव आमझरे (३३) यांनी अमोल निमकर यांच्या शेताजवळ उभी केलेली एमएच २७ सीई ६९६६ क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला.
-----------
मद्यपीने वृद्धाला केले जखमी
आसेगाव पूर्णा : निरूळ गंगामाई येथील एकनाथ खानंदे यांनी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मोहन पुंडलिकराव पारिसे (४०) याने काठीने जबर मारहाण केली. याप्रकरणी आसेगाव पूर्णा पोलिसांनी भादंविचे कलम ३२६ सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
------------
अकारण शिवीगाळ, विळ्याने मारहाण
मंगरूळ चव्हाळा : नजीकच्या पिंपळगाव निपाणी येथील मायलेकांना सुनील रमेश मिसाळ (४०) व अंतोश देविदास मिसाळ (३०) यांनी शिवीगाळ केली व विळ्याने मारहाण केली. याप्रकरणी नंदकिशोर वायकर (२७) यांच्या तक्रारीवरून मंगरूळ चव्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
-----------
समृद्धी महामार्गाचे साहित्य लंपास
नांदगाव खंडेश्वर : समृद्धी महामार्गाच्या शिवणी कॅम्प येथील प्रकल्पस्थळावर ३७ हजारांचे ८२ स्टील क्रॉस बॅरेल लंपास करण्यात आले. प्रशासकीय अधिकारी राकेश पांडे (४५) यांनी नांदगाव खंडेश्वर पोलिसांना याप्रकरणी गुन्हा नोंदविला.