अमरावती : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगयांच्या संयुक्त विद्यमानेराष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त गुरुवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत ‘ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नवीन स्वरुप’ या विषयावर राज्यस्तरीय वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच ग्राहकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
0000
तालुकास्तरीय मासिक शिबिराचे आयोजन
अमरावती : प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे मोटार वाहन निरीक्षकांच्या उपस्थितीत जानेवारी ते जून महिन्यात तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कर स्वीकारणे, शिकाऊ उमेदवार अनुज्ञप्ती, वाहनाची अनुज्ञप्तीची चाचणी (जड वाहने वगळून), कंडक्टर लायसन्स चाचणी, नवीन वाहन नोंदणी इत्यादी कामे पूर्ण करण्यात येणार आहे. सदर शिबिरात संबंधित तालुक्यातील रहिवासी नागरिकांचीच कामे करण्यात येणार आहे. या शिबिराचा जनतेने लाभ घेण्याचे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे.
0000
जिल्ह्यातील रेतीघाट लिलावाच्या ई-निविदा प्रक्रिया सुरू
अमरावती : सन २०२०-२१ या वर्षासाठी येत्या ९ जूनपर्यंत जिल्ह्यातील चार तालुक्यातील १५ रेती स्थळांच्या लिलावाची ई-निविदा-ई लिलाव ऑनलाईन प्रणालीव्दारे २२ डिसेंबरपासून करण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
00000
शहरात कलम ३७ (१) व (३) लागू
अमरावती : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस उपायुक्त (अमरावती शहर) शशिकांत सातव यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. हे आदेश पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्रात २३ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत लागू राहील. या कलमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही शहर पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी कळविले आहे.