अमरावती : स्थानिक ऊर्जा भवनसमाेरून गर्ल्स हायस्कूलकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहेत.
.....................................
झेडपीच्या आवारात कचऱ्याचे ढीग
अमरावती : जिल्हा परिषदेच्या आवारातील आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या मागे कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहेत. या कचऱ्यामुळे परिसरातील जागाही व्यापली आहे. त्यामुळे हा कचरा उचलण्यासाठी यंत्रणेला जाग केव्हा येणार, हा खरा प्रश्न आहे.
.............................................................
मिनिमंत्रालयात माकंडाचा संचार
अमरावती : दिवसेंदिवस माकडाचा वावर लोकवस्तीत वाढला आहे. शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास माकडाचा एक कळप येथील जिल्हा परिषदेच्या आवारात शिरला होता. या माकडांनी जिल्हा परिषदेच्या आवारातील वृक्ष व उद्यान परिसरात काही तास ठिय्या मांडला हाेता.
.......................
व्हीएमव्ही मार्गावरील पथदिवे बंद
अमरावती : शेगाव नाका ते कठोरा नाका मार्गावर असलेले पथदिवे दोन दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे अतिशय वर्दळीच्या या मार्गावर अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे बंद असलेले पथदिवे सुरू करण्याची मागणी होत आहे.
.....................................................
गावागावांत रंगू लागल्या निवडणूकीच्या गप्पा
अमरावती : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे विविध गावांत अनेक गट तट या निवडणूकीत सक्रिय झाले आहेत. त्यामुळे गावोगावी सध्या निवडणुकीच्या गप्पाची चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे.