अमरावती : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील उद्यानाचा कायापालट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शनिवारी या उद्यानात किरकोळ दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहे.
..........................................................
विदर्भस्तरीय मूर्तिकार बचाव मोर्चा
अमरावती : विदर्भ कुंभार समाज संघटनेच्यावतीने १९ जानेवारी रोजी विदर्भस्तरीय मूर्तिकार बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे. इर्विन चौकातून हा मोर्चा जिल्हाकचेरीवर धडकणार आहे.
........................................
जिल्हा परिषदेत आढावा बैठक
अमरावती : रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीला डेप्युटी सीईओ, बीडीओ व अन्य अधिकारी उपस्थित होते.
.................................................
खिराळा ते लखाड रस्त्यावरील पुलाची उंची वाढवा
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील खिराळा ते लखाड मार्गावर असलेल्या पुलांची उंची कमी व अरूंद आहे. त्यामुळे पावसाळयाच्या दिवसांत या मार्गावरील गावांचा पुरामुळे संपर्क तुटतो. तसाही वाहतुकीच्या दृष्टीने हा पुल गैरसोईचा होत आहे. त्यामुळे खिराळा गावालगतच्या या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे.
......................................
नवसारी चौकातील वाहतूक सिग्नल बंद
अमरावती : परतवाड्याकडून नवसारीकडे येणाऱ्या महर्षी शाळेच्या चौकात वाहतुक सिग्नल बसविण्यात आले आहे. मात्र, अद्यापही हा सिग्नल बंद आहेत. परिणामी या चौफुलीवर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. वाहतुकीच्या उद्देशाने हा बंद असलेला सिग्नल सुरू करण्याची मागणी होत आहे.