अमरावती : जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण बुधवारपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी सीईओ अमोल येडगे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनीही पहिल्याच दिवशी कोरोना लस टोचून घेतली आहे.
....................
शाळकरी मुलांना सायकल वाटप
अमरावती : वलगाव येथे राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांच्या पुढाकाराने नुकतेच शेतकरी ,शेतमजूरांच्या शाळकरी पालाल्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी प्रेमकिशोर सिकची,दिलीप काळे,बाळासाहेब अढाऊ,प्रशांत डवरे, नितीन कदम, मिलिंद फाळके, मोहिनी मोहोड, अनिस मिर्झा उपस्थिती होते.
....................
वर्धमाननगरात मैदानाला संरक्षक भिंत
बडनेरा : नवी वस्ती बडणेरा प्रभाग क्रमांक २२ येथे नगरसेविका अर्चना धामणे यांच्याकडे खेळाचे मैदान व त्याला संरक्षण भिंत बांधण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत मैदानाला संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे.
..........
रविनगर येथे कर्करोग निदान शिबिर
अमरावती : कौशल्य फाउंडेशन नवजीवन मल्टिसर्व्हिसेस व जन आरोग्यम् जेनेरिक यांच्या संयुक्त विद्यमाने जेनेरिक मेडिकल स्टोअर्स रविनगर हनुमान मंदिर येथे मोफत कर्करोग निदान व मधुमेह तपासणी शिबिर घेण्यात आले. ५१ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
............
किसान संघर्ष समितीची सभा
तिवसा: शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा देण्यासाठी किसान सभा सज्ज झाली आहे. यासंदर्भात पुढील रणनीती ठरविण्यासाठी गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता अध्यात्म गुरुकुल केंद्र तिवसा गुरुदेव नगर येथे किसान संघर्ष समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे.
...................