दुचाकी अपघातात इसमाचा मृत्यूअचलपूर : येथील रणबाबा दर्ग्याजवळ दुचाकीने दिलेल्या धडकेत अन्य दुचाकीवरील इसमाचा मृत्यू झाला. २५ जानेवारी रोजी हा अपघात घडला होता. मृताचा भाऊ मो. हनिफ मो. बशिर यांच्या तक्रारीवरून अचलपूर पोलिसांनी १३ फेब्रुवारी रोजी एमएच २७ बीपी ५३२३ या दुचाकीचा चालक लोकेश हिरालाल कासदेकर (रा. बुरळघाट, अचलपूर) याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
-----------
कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
परतवाडा: अचलपूर तालुक्यातील मल्हारा गावालगतच्या निमदेव बाबा मंदिराजवळ कारने दिलेल्या धडकेत रंगो बाबुलाल उईके (४२, रा. कोयलारी) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती बाबुलाल उईके हे गंभीर जखमी झाले. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी हा अपघात घडला होता. परतवाडा पोलिसांनी एमएच २७ बीव्ही ३२२३ या कारच्या चालकाविरूद्ध १३ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदविला.
-------------
साक्षगंध तोडून टाकण्याची धमकी, तरूणाला भोसकले
परतवाडा: साक्षगंध तोडून टाक, अन्यथा जीवाने मारेन, अशी धमकी देऊन गिरिश चापके (३१) याला मारहाण करण्यात आली. तथा शस्त्राने पोटावर वार करण्यात आला. १० फेब्रुवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास परतवाड्यातील अंजनगाव स्टॉपवर गिरिश चापके याला बोलावण्यात आले. तेथे ही घटना घडली. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी आरोपी किरण पानझडे, रामेश्वर पानझडे, अजय दिगांबर तायडे, अविनाश तायडे (सर्व रा. अंजनगाव स्टॉप, परतवाडा) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
महिलेचा विनयभंग
चांदूरबाजार : तालुक्यातील कु रळपुर्णा येथील एका विवाहितेचा तिच्या घरात शिरून विनयभंग करण्यात आला. १२ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० ते १२ च्या सुमारास ही घटना घडली. चांदूरबाजार पोलिसांनी आरोपी राजेश धाकडे (३५, कुरळपुर्णा) याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
-------------
चंडिकापूर येथे तरूणाला मारहाण
भातकुली: तालुक्यातील खोलापूर पोलिसांच्या हद्दीतील चंडीकापूर येथील शुद्धोदन चोरपगार (३४) याला गावातीलच दोघांनी शुल्लक कारणावरून मारहाण केली. १३ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी खोलापूर पोलिसांनी आरोपी गुलशन जानराव सावरकर (२३) व एका महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
------------------
जनुना येथे महावितरण कर्मचाºयांला मारहाण
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील जनुना येथे थकीत बिल का भरले नाही, अशी विचारणा करणाºया महावितरणच्या कर्मचाºयाला मारहाण करण्यात आली. शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. १३ डिसेंबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी लोणी पोलिसांनी निकलेश गजभिये (३१) यांच्या तक्रारीवरून आरोपी शुभम सिरारामसिंग गौर (३०, रा. जनुना) याचेविरूद्ध गुन्हा नोंदविला.
-----------
कुण्णपुरात दाम्पत्याला मारहाण
आसेगाव : कुण्णपूर येथील संजय वायकर यांना विळा मारण्यात आला. तर वाद सोडविण्यास गेलेल्या त्यांच्या पत्नीला शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. आसेगाव पोलिसांनी आरोपी संजय विश्वनाथ वायकर (४५) याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
------------
निमखेड शिवारातून केबल लंपास
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील निमखेड बाजार शिवारातून राधेशाम शिंदे यांच्या बोअरवरील केबल वायर लंपास करण्यात आला. १२ ते १३ फेब्रुवारीदरम्यान ही घटना घडली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
-------------------
पांढरी बसस्टॉपवर पादचाºयाला धडक
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील पांढरी बसस्टॉपजवळ रोड क्रॉस करत असताना दुचाकीने दिलेल्या धडकेत गावातीलच एक इसम गंभीर जखमी झाला. ८ फेब्रुवारीरोजी दुपारी हा अपघात घडला. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी जखमीचा लहान भाऊ रामेश्वर तायडे (पांढरी) यांच्या तक्रारीवरून एमएच २७ बीवाय ६४६६ या दुचाकीच्या चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
लक्ष्मी टॉकीज परिसरात मारहाण
अंजनगाव सुर्जी : स्थानिक लक्ष्मी टॉकीज परिसरात उधारीच्या पैशावरून अजय घुसे (३८, तेलीपुरा) याच्या डोळ्यावर काचेचा ग्लास मारण्यात आला. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ही घटना घडली. अंजनगाव पोलिसांनी आरोपी निलेश अग्रवाल (रा. लक्ष्मी टॉकीज) याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
-------------
मतदानाच्या वादातून तरूणांना मारहाण
खल्लार : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली शिंगणे येथील दोन तरूण भावांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. फिर्यादी रत्नप्राभा भरत ठाकरे (६४) या त्यांच्या मुलांना आवाज देण्यासाठी घराबाहेर पडल्या असता, त्यांना थांबवून आम्ही तुमच्या मुळे सरपंच बनू शकलो नाही, आम्हाला मतदान का केले नाही, अशी विचारणा केली. त्याचवेळी रत्नप्रभा ठाकरे यांच्या दोन्ही मुलांना खाली पाडून मारहाण करण्यात आली. १२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास हा प्रकार घडला. खल्लार पोलिसांनी आरोपी नंदू शिंगणे, पंकज शिंगणे, रमेश शिंगणे, चेतन शिंगणे, प्रकाश शिंगणे, रमेश नामदेव शिंगणे, मयुर शिंगणे, अनू गोपाळ शिंगणे, गोपाळ शिंगणे अशा नऊ जणांविरूद्ध भादंविचे कलम १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.
------------------
ंअल्पवयीन मुलीला पळविले
येवदा : दर्यापूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील एका १७ वर्षे ९ महिने वयाच्या मुलीला पळवून नेण्यात आल्याची तक्रार १३ फेब्रुवारी रोजी येवदा पोलिसांत नोंदविण्यात आली. १० फेब्रुवारी रोजी रात्री ९ च्या दरम्यान घराबाहेर पडलेली मुलगी घरी न परतल्याने तिचा शोध घेण्यात आला. मात्र ती न मिळाल्याने येवदा पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली.
--------------
टिंगºया येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता
धारणी : तालुक्यातील टिंगºया येथील एक १६ वर्षीय मुलगी कुणालाही न सांगता घरून निघून गेली. ११ फेब्रुवारी रोजी हा प्रकार उघड झाला.याप्रकरणी तिच्या पालकांच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी १३ फेब्रुवारी रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
------------
मोथा जि.प. शाळा फोडली
चिखलदरा: तालुक्यातील मोथा जिल्हा परिषद शाळा फोडून १६ हजार रुपये किमतीचा एलईडी टिव्ही व तेवढ्याच किमतीचा प्रोजेक्टर लंपास करण्यात आला. १२ फेब्रुवारी रोजी रात्रीदरम्यान ही घटना घडली. शिक्षिकेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
-----------
खेड येथे मारहाण
मोर्शी : तालुक्यातील खेड येथील एका तरूणाला काठीने मारहाण करण्यात आली. मध्यस्थी करण्यास गेलेल्या त्याच्या पत्नीच्या हाताला मार लागला. १२ फेब्रुवारी रोजी रात्री ही घटना घडली. मोर्शी पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून आरोपी अजय ज्ञानेश्वर मरकाम याचेविरूद्द गुन