नांदगाव खंडेश्वर : बटाईने केलेल्या दीड एकर शेतातील चण्याचे १० पोत्यांसह स्प्रिंकलर संच अज्ञाताने लंपास केल्याची घटना ३० मार्च रोजी उघडकीस आली. शाहुराव देवराव बुऱ्हांडे (६५, रा. सावनेर) यांच्या तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------
रस्त्यात अडवून इसमाला मारहाण
भातकुली : इसमाला रस्त्यात अडवून, तिघांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना २८ मार्च रोजी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोळवण हनुमान मंदिरालगत घडली. सुखदेव गोविंद जाधव (६५, हातुर्णा) यांच्या तक्रारीवरून नांदगाव पोलिसांनी महादेव कोळूजी थोरात (५५), नवनाथ विठ्ठल थोरात (४०), व चंदू प्रल्हाद मेश्राम (३०, सर्व रा. जावरा मोळवण) यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविली.
---------------------
५१ हजारांचा मुद्देमाल जबरीने हिसकावला
धारणी : दुचाकीसह १० हजार रुपये रोख व मोबाईल असा ५१,२०० रुपयांचा मुद्देमाल युवकाकडून हिसकण्यात आले. ही घटना तालुक्यातील पोटीलावा शिवारातील बोरी फाटा येथे २९ मार्च रोजी घडली. राजेंद्र मुन्सी धांडे यांच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------------
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
धारणी : तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याची घटना २९ मार्च रोजी घडली. वडिलांच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी भैयू राजेश मुंडेकरविरुद्ध भादंविचे कलम २२८, २१, ३६३ अन्वये गुन्हा नोंदविला.
-------------
घरासमोर उभी केलेली दुचाकी लंपास
ब्राम्हणवाडा थडी : घरासमोर उभी करून ठेवलेली दुचाकी (एमएच २७-एएस ९२९९) अज्ञाताने लंपास केल्याची घटना ब्राम्हणवाडा थडी येथे २७ मार्च रोजी घडली. विजय जानराव रेखात (३४) यांच्या तक्रारीवरून ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध ३० मार्च रोजी गुन्हा नोंदविला.
---------------
युवतीच्या डोक्यावर काठीने वार
परतवाडा : वडुरा येथे आईसोबत तिघांनी घातलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या युवतीला डोक्यावर काठीने मारून जखमी करण्यात आले. युवतीच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी राजेश फत्तू दहीकर ४५), रमेश राजेश दहीकर (२०) व अनिल कालू काळे (१८, रा. बेलखेडा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------