अमरावती : शहरातील बाजारपेठेत कोकणसह अन्य राज्यांतील विविध प्रजाचा आंबा विक्रीसाठी दाखल झाला आहे. नागरिकही आवडीने आंब्याची खरेदी करताना दिसत आहेत. यामध्ये हापुसला अधिक मागणी दिसून येत आहे.
...........................
शासकीय कार्यालयांना दोन दिवस सुट्या
अमरावती : शासकीय कार्यालयांना तिसरा शनिवार व लागूनच रविवार असल्याने टाळे आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालय आता सोमवारी नेहमीप्रमाणे उघडणार आहेत.
..................................................
आरटीई प्रवेश दस्ताऐवज पडताळणी लांबण्याची शक्यता
अमरावती : आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी सोडत काढण्यात आली. प्रारंभी सध्या कोरोनामुळे संचारबंदी लागू केली आहे. शाळा बंद असल्यामुळे आरटीई प्रवेशासाठी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या दस्तऐवजांची पडताळणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
......................
महिला स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य
अमरावती : जिल्हा परिषदेत महिलांसाठी असलेल्या प्रसाधनगृहात काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याबाबत महिला कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त सीईओंकडे तक्रार केल्यानंतरही त्याची दखल संबंधित विभागाकडून घेतली जात नसल्याने महिला कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
...................................
आसेगाव ते खैरी रस्ता उखडला
अचलपूर : आसेगाव - दर्यापूर मार्गावरील खैरी फाटा ते गावाकडे जाणारा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.