अमरावती : जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा येत्या २३ एप्रिल रोजी होत आहे.या सभेच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
............................
नळजोडणीसाठी जादा शुल्क वसुली
अमरावती: कठोरा बु. गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घरगुती नळ जोडणीसाठी जादाची शुल्क वसुली कंत्राटदारांकडून केली जात आहे.त्यामुळे ही शुल्क वसुली कमी करावी अशी मागणी पं.स.उपसभापती रोशनी प्रवीण अडसपुरे यांनी मजिप्रा अधिकाऱ्याकडे केली आहे.
...................
पीएचसीत लसीकरण सुरू
अमरावतीक; प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण गत दोन दिवसांपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण स्टॉक संपल्यामुळे बंद होते.आता मात्र लसीचा साठा पोहोचल्यामुळे पीएचसीतील लसीकरण सुरू होणार आहे.
......................................
बाजारपेठेत खरबुजाची आवक
अमरावती: बाजारपेठेत खरबुजाची आवक होत आहे.शहरातील विविध मार्गावर खरबूज विक्रीची दुकाने सजली आहेत.ग्राहकही आवडीने या फळाची खरेदी करताना दिसून येत आहे.
....................
कारला येथे रक्तदान शिबिर
अंजनगाव सुजी ; तालुक्यातील कारला येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नुकतेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.