अमरावती : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंगळवारी चांदूर बाजार येथील कोरोना केअर सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य सुविधा व अन्य उपाययोजनांबाबत माहिती घेतली आणि महत्त्वाच्या सूचना संबंधितांना केल्या.
................................
आरोग्य सभापतीकडून आढावा
अमरावती : जिल्हा परिषदेचे आरोग्य व वित्त समितीचे सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी नांदगाव पेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. नितीन हटवार व आरोग्य विभागाचे कर्मचारी हजर होते.
........................
जिल्हा परिषदेत २३ एप्रिलला सभा
अमरावती : जिल्हा परिषद कृषी विषय समितीची सभा २३ एप्रिल राेजी ऑनलाईन होणार आहे.उपाध्यक्ष तथा सभापती विठ्ठल चव्हाण यावेळी विविध कामांचा तसेच योजनांचा आढावा घेणार आहेत.
......................
शासकीय कार्यालयातील गर्दी ओसरली
अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासकीय कार्यालयातील नागरिकांची कामासाठी होणारी गर्दी संचारबंदी लागू केल्यामुळे ओसरल्याचे चित्र विविध शासकीय कार्यालयांत दिसून आले.
...............................................
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी गर्दी
अमरावती: कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा साठा उपलब्ध होताच शहरातील विविध लसीकरण केंद्रावर नागरिकांची लस टोचून घेण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे, लस घेण्याकडे नागरिकांचा कलही वाढला आहे.