अमरावती : जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात उकाड्यात बसून कर्मचारी कामकाज करीत आहे. या विभागात प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची आवश्यक व्यवस्था केली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
.......................................................................
सीईओंनी मार्डी पीएचसीची पाहणी
अमरावती : तिवसा तालुक्यातील मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी सीईओ अविश्यांत पंडा यांंनी नुकतीचे केली आहे.यावेळी त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन तेथील परिस्थितीची माहिती जाणून घेतली.
....................................
ऑनलाईन माध्यमांव्दारे सोमवारी लोकशाहीदिन
अमरावती : जिल्हा लोकशाहीदिन सोमवारी ३ मे दुपारी १ वाजता ऑनलाईन माध्यमाद्वारे होणार आहे. व्हिडीओ काँफ्रंसिग वेबेक्स सॉफ्टवेअर लोकशाही दिनाची ऑनलाईन बैठक होणार आहे. सर्व संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
............................................................................
काळ्या गुळाचा बुधवारी लिलाव
अमरावती : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरूड येथील सीमा तपासणी नाका शाखेने एका गुन्ह्यात २२ टन ६०५ किलो काळा गूळ जप्त केला. आता वरूड न्यायालयाच्या आदेशानुसार त्याचा लिलाव होणार आहे. हा काळा गूळ अबकारी विभागाच्या एम-१ व एम-२ अनुज्ञप्तीधारकांनाच लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. हा लिलाव वरूडमधील रवाळा येथील सीमा तपासणी नाका येथे ४ मे रोजी सकाळी ११ वाजता होईल. संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
...........................................
पळसखेड ते गरजदरी रस्त्याची मागणी
अंजनगाव सुर्जी : पळसखेड ते गरजदरी गावाकडे जाणारा कच्चा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी या परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे.