अमरावती: स्थानिक माधवनगरातील रस्ता मजिप्राने कामासाठी खोदून ठेवला आहे.मात्र कामझाल्यानंतर या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे रस्ता दुरूस्त करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मिलींद बांबल यांनी दिला आहे.
...........................
महाराष्ट्र दिनापासून घरोघरी सॅनिटायझर फवारणी
अमरावती: शिवसेना महानगराच्या वतीने १ मे या महाराष्ट्र दिनापासून शहरातील घरोघरी कोरोनाला रोखण्यासाठी सॅनिटायझरची फवारणी अभियान राबविले जाणार आहे.महानगरप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतुत्वात हा उपक्रम राबविला जाणार आहे.
...................................
आरोग्य समितीची सभा
अमरावती :जिल्हा परिषद आरोग्य विषय समितीची सभा शुक्रवारी दूपारी १ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे.यावेळी आरोग्याच्या विषयावर चर्चा केली जाणार आहे.
.........................................
हिरापूर येथे साध्यापध्दतीने हनुमान जयंती
अंजनगाव सुजी; तालुक्यातील हिरापूर येथे नुकताच हनुमान जयंतीचा कार्यक्रम साध्यापध्दतीने पार पडला.कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता कुठलेही कार्यक्रम राबविण्यात आले नाहीत.
...................................
लस टंचाईने नागरिक त्रस्त
अमरावती; कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे ग्रामीण भागात लसीकणासाठी आलेल्या नागरिकांना लस उपलब्ध नसल्याने लसीविनाच घरी परतावे लागलेत.