अमरावती : जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा विविध विषयांना अनुसरून शुक्रवार, २१ मे राेजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी समितीचे पदाधिकारी व निवडक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
..................................
हॉटेल उघडण्याची परवानगी द्या
अमरावती : जिल्ह्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. आता परिस्थितीत काहीशी सुधारणा होत आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना पार्सल सुविधेसाठी प्रतिष्ठाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हाॅटेल व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
...........................
वीज पुरवठा खंडित कामकाज विस्कळीत
अमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील वीज पुरवठा बंद असल्याने गुरुवारी या विभागातील प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामाविनाच बसावे लागले.
.............................................
कांदा खरेदीची लगबग वाढली
अमरावती : सध्या उन्हाळी कांदा निघाला असून कांदा खरेदीसाठी शहरात ठिकठिकाणी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत आहेत.
...............................................
लसीकरणासाठी नागरिकांचे वेटिंग
अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी अनेक नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. मात्र, पुरेसा लससाठा उपलब्ध होत नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक लसीकरणासाठी वेटिंगवर आहेत.