दर्यापूर : तालुक्यातील येवदा येथील पिण्याच्या पाण्याची टाकी क्षतिग्रस्त झाली आहे. त्यामुळे ही टाकी तातडीने नव्याने बांधण्यात यावी, अशी मागणी प्रहारचे पदाधिकारी प्रदीप वडतकर यांनी मजीप्राकडे केली आहे. सदर टाकीचे बांधकाम त्वरित न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
.....................................
कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटप
अमरावती : जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्यावतीने नुकतेच जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
...................................................
वीजपुरवठा खंडित कामकाजात अडथळा
अमरावती : सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील वीजपुरवठा खंडित झाल्याने सोमवारी दुपारी कामकाज विस्कळीत झाले. त्यामुळे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना काहीवेळ ताटकळत बसावे लागले.
.................................
निमखेड ते सावरपाणी रस्ता उखडला
अंजनगाव सुजी : तालुक्यातील निमखेड बाजार ते सावरपाणी गावाकडे जाणारा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावे लागत आहे.
.................................................
कोरोना लसीच्या दुसऱ्या डोजची प्रतीक्षा
अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत आहे. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्या अनेक नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा लागलेली आहे.