अमरावती : महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा, गटप्रवर्तक संघटनेच्या नेतृत्वात आशा, गटप्रवर्तकांनी विविध न्याय्य मागण्यांसाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. आपल्या न्याय्य मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
............................................................
झेडपीत साथरोग नियंत्रण कक्ष
अमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता, साथरोग नियंत्रणासाठी कक्ष सुरू केला आहे. या माध्यमातून विविध आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
...................................................
अभियंता कॉलनीत विजेचा लंपडाव
अमरावती : कठोरा नाका परिसरातील अभियंता कॉलनी येथे दोन दिवसांपासून वीज जोडणी करणारे केबल लूज झाले आहेत. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होत आहे.
............................
ऊर्जा भवनासमोरील रस्ता उखडला
अमरावती : पंचवटी ते ऊर्जा भवनसमोरून गर्ल्स हायस्कूलकडे जाणारा डांबरी रस्ता उखडला आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ता दुरुस्त करणे आवश्यक आहे.
.............................
झेडपीत नागरिकांची वर्दळ वाढली
अमरावती : कोरोना वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधात शिथिलता मिळताच जिल्हा परिषदेत ग्रामीण भागातून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वर्दळ वाढली आहे.