अमरावती : शासकीय कार्यालयांना सलग दोन दिवस सरकारी सुट्या आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत शनिवारी सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. सोमवारपासून मात्र नेहमीप्रमाणे रेलचेल वाढणार आहे.
............................................
पावसाची दडी,शेतकरी चिंतेत
अमरावती : पावसाने दडी मारल्यामुळे सध्या शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. गत काही दिवसांपासून पाऊस पडला नसल्यामुळे पेरणी उलटण्याची दाट शक्यता आहे.
....................................................
शहरातही वाढला विजेचा लंपडाव
अमरावती : मागील काही दिवसांपासून अवेळी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्रस्त झाले आहेत. परिणामी महावितरणने अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
.................................
कठोरा नाका ते हर्षराज कॉलनीचा रस्ता उखडला
अमराती : स्थानिक कठोरा नाका ते हर्षराजकडे जाणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
........................
अंजनगावात बस आगार केव्हा?
अंजनगाव सुर्जी : मागील कित्येक वर्षांपासून येथे एसटी बस आगाराची मागणी होत आहे. परंतु, अद्यापही या मागणीला शासनाकडून हिरवी झेंडी मिळाली नाही. तालुक्याचे ठिकाण असताना या ठिकाणी आगार नसल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.