अमरावती : जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशव्दारा समोरील खडे अखेर बांधकाम विभागाने मुरूम टाकून बजविले आहेत. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते.
..................................
झेडपी उद्यानात वृक्षारोपन
अमरावती : जिल्हा परिषद मुख्यालय परिसरातील उद्यानात सोमवारी सीईओ अविश्यांत पंडा यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
...............................
पावसामुळे शेतकरी सुखावला
अमरावती : गत दोन दिवसात पासूृन शहर व ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावल्याचे चित्र दिसून येत आहे.
...............................................
हिरापूर ते पळसखेड रस्ता उखडला
अंजनगाव सुजी ; तालुक्यातील हिरापूर ते पळसखेडकडे जाणारा डांबरी रस्ता उखडला आहे.या नादुरूस्त रस्त्यामुळे शेतकरी,शेतमजूर आणि वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.त्यामुळे रस्ता दुरूस्तीची मागणी होत आहे.
..................
टीनपत्र्याची मागणी वाढली
अमरावती : सध्या पावसाचे दिवस असल्याने ग्रामीण भागात घरावर छत गळत असल्याने अनेक जण टीनपत्रे खरेदी करतांना बाजार पेठेत दिसून येत आहे.विशेष म्हणजे टीनपत्र्याचे दरही चांगलेच वाढले आहेत.