अमरावती : पंचवटीकडून गर्ल्स हायस्कू चौकाकडे जाणारा ऊर्जा भवनसमाेरील डांबरी रस्ता उखडला असून, ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.
.........................................
प्रशांतनगर मार्गावरील अतिक्रमण हटविले
अमरावती : स्थानिक प्रशांतनगर ते मोतीनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भाजी व फळविक्रेत्यांनी दुकाने थाटून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. सदर रस्त्यालगतचे अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविल्यामुळे वाहतुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे समाधान व्यक्त होत आहे.
...............................................................
झेडपीसमोर वाहनांच्या रांगा
अमरावती : जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रांगा अवैधरीत्या लागत आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने वाहनधारकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
......................................
गावाेगावी निवडणूकीच्या गप्पा
अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होवू घातल्या आहेत.१५ जानेवारीला याकरीता मतदान होणार असून या निवडणूकीमुळे गावोगावी राजकीय गप्पा चौकाचौकात रंगत आहेत.
................................................................
बांधकाम विभागाचा आढावा
अमरावती: जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून करण्यात येणाऱ्या विविध कामांचा गुरूवारी अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेतला जाणार आहे.याकरीता १६ डिसेंबर रोजी प्रशासनाची पूर्व तयारी जोरात सुरू होती.
.............................................................................................................